Monday, August 1, 2016

ATM राज्यस्तरीय शिक्षण सम्मेलन शिर्डी

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) चे राज्यस्तरीय शिक्षण संमेलन संपन्न .
कोकमठाण शिर्डी (दि.१५)-
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे दोन दिवशीय शिक्षण संमेलन दिनांक १४ व १५ मे रोजी कोकमठाण शिर्डी येथील आत्मा मलिक सभागृहात संपन्न झाले .
     व्हाॕट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक प्रेरणादायी व स्वसक्षमीकरणासाठी  विशाल कार्य व रचनात्मक काम ATM ने उभे केले आहे.महाराष्ट्रातील कानाकोप-यातून शिक्षक,शिक्षिका  स्व खर्चाने ,सुट्टीअसूनही संमेलनासाठी आले होते.
संमेलनातील ठळक बाबी:-
दिवस १ला:-
कार्यक्रमाचे उदघाटन सूर्यवंशी साहेब ,व्यवस्थापक आत्मा मलिक ट्रस्ट तथा माजी उपशिक्षणाधिकारी , धुळे ,ह.ना.जगताप व ATM चे आयोजक विक्रम अडसुळ यांचे हस्ते झाले.
प्रास्तविकात विक्रम अडसुळ यांनी शैक्षणिक संमेलन आयोजनाची भूमिका स्पष्ट केली .
१.मा.ह.ना.जगताप (मानसशास्त्रीय अभ्यासक) यांनी ताण तणावाचे व्यवस्थापण या विषयावर मार्गदर्शन केले.
२.सोमनाथ वाळके सरांनी  "मूल समजून घेताना" हा विषय खूप सोप्या पद्धतीने मांडला.
३."शिक्षणातील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर " या परिसंवादात सुनिल अलुरकर,रणजितसिंह डिसले,स्वरदा खेडकर,अनिल कांबळे,अनिल सोनुने यांनी
 सहभाग घेऊन प्रभावीपणे समजावले.
४."माझी शाळा माझे उपक्रम " या सदरात ज्योति बेलवले,ज्ञानदेव नवसरे,मंगल पवार,दिपाली बाभूळगांवकर,अलका धांडे,पौर्णिमा राणे,जयमाला मुळीक यांनी आपल्या शाळेत राबवित असलेल्या उपक्रमाबाबत निवेदन केले.
५."शाळा प्रगत करताना  " या विषयाच्या परिसंवादात स्नेहा मगदुम,कविता बंडगर,किशोर गर्जे,ज्ञानेश्वर इंगळे,मनिषा पांढरे ,महेश घुगरे यांनी स्वानुभव कथन केले.
६.मुंबईचे शिक्षणनिरीक्षक अनिल साबळे साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थामधील शाळा बदलत असल्याचे स्पष्ट केले.
७.प्रथम दिवसाचा समारोप महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक मा.गोविंद नांदेडे साहेबांच्या प्रकट मुलाखतीने झाला .विक्रम अडसुळ व ज्योति बेलवले यांनी सुंदर मुलाखत घेतली .साहेबांनी आपला खडतर जीवनपट मनमोकळेपणे विषद केला.साहेबांचा प्रत्येक शब्द प्रेरणादायी होता.

दिवस २रा :-
१."रचनावाद समजून घेताना " या विषयावर ग्राममंलचे डाॕ .रमेश पानसे यांनी यांनी चिकित्सक बाबी मांडल्या .
२.अवघ्या महाराष्ट्रासाठी ज्ञानपंढरी कुमठे बीटला बनविणा-या प्रतिभाताई भराडे मँडम यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व मेंदूचा अभ्यास सुंदर शब्दांत व्यक्त केला .
३.वंचितांचे शिक्षण व RTE  या परिसंवादात संदीप वाघचौरे,मतीन भोसले ,मनिषा जराड,संतोष मुसळे,दत्ता अम्रित यांनी भाग घेतला .
४."इंग्रजी अध्यापनात मातृभाषेचा वापर करावा की नको " या विषयावर म.रा.पा.नि.मंडळ सदस्य नदीम खान,प्रिती खांडेलवार,अरुणा उदावंत,प्रभाकर लोंढे,नारायण मंगलाराम,गजानन उदार,प्रशांत शेवतकर यांनी विचार मांडले.
५."शैक्षणिक गुणवत्तेत शिक्षकांचे स्वसक्षमीकरण " या विषयाच्या परिसंवादात महाराष्ट्राचे गुणवत्ता प्रेरक सोमनाथ वाळके, म.रा.पा.नि.मंडळ सदस्य समाधान शिकेतोड,आदर्श शाळा जरेवाडीचे अजय घोडके,ISO शाळा रजापूर चे संजय खाडे यांनी विचार मांडले.QR कोड पाठ्यपुस्तकांत आणणारे रणजिंतसिंह डीसले यांनी सुत्रसंचलन केले.
शिक्षकांचे मनोगतात भरत काळे यांनी शिक्षकांची अशी संमेलन आवश्यक असल्याचे सांगितले .
६.लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मँडम यांनी भ्रमणध्वनीद्वारे शिक्षकांना शुभेच्छा दिल्या .
७.कृतिशील शिक्षक महाराष्ट्र  परिवाराचे संयोजक विक्रम अडसुळ सरांनी ATM ची भूमिका स्पष्ट करुन समारोप केला .
सकाळी ९ पासून रात्री १० पर्यंत एक एक मिनिट वाया न जाऊ देता इथे ज्ञान यज्ञ पार पडला.मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा वेळ बसून श्रवण केले असे बरेच बोलत होते.श्रवण  ,मनन,चिंतन,निवेदन अशा बाबीत वेळ कुठे गेला हे कळलेच नाही. औरंगाबादहून राजू कोळी, रमेश परदेशी ,हाशम शहा,सत्यवान हरेल, मोहन राख,मनोहर नागरे ,गिरीश क्षिरसागर , भरत काळे,नारायण मंगलारम,संजय खाडे आम्ही दहा शिलेदार उपस्थित राहिलो .भरभरुन शिकायला मिळाले.शिक्षकांनी शिक्षकांसाठी शिक्षकांचे भरवलेले हे शैक्षणिक संमेलन ऐतिहासिक ठरले आहे.
     ⚽शब्दांकन⚽
  संजय खाडे ,औरंगाबाद .

No comments:

Post a Comment

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल