Monday, October 26, 2015

बारामती येथे प्रगत् शै महाराष्ट्र व् तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न

🌍 बारामती येथे राज्यातील 'पहिली प्रात्यक्षिक तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा' मोठया उत्साहात संपन्न..🌎 आज दिनांक २५/१०/२०१५ रोजी बारामती येथे तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा आयोजनात पंचायत समिती बारामतीचे गटशिक्षणाधिकारी श्री. नवनाथ वनवे साहेब तसेच श्री. रामदास काटे सर व सौ. काटे मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे. कार्यशाळेविषयी थोडक्यात माहिती..... ♦शिक्षकांना विद्यार्थ्यासाठी 'टेकसेव्ही' बनवण्यासाठी आणि 'ज्ञानरचनावादात तंत्रज्ञानाचा वापर' या गोष्टीवर विशेष भर सदर कार्यशाळेत देण्यात आला. ♦सदर कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.सुरेश भारती सर, श्री. विक्रम अडसुळ सर, श्री.लक्ष्मण नरसाळे सर, श्री.गोरक्ष पावडे सर हे उपस्थित होते. ♦सदर कार्यशाळेसाठी १०५ शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्व लॅपटॉप सह... अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच प्रात्यक्षिकासह झालेली कार्यशाळा... ♦प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावर पीपीटी दाखवून श्री. विक्रम अडसूळ सर यांनी शंका, समाधान ,आणि मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे मूल समजून घेताना आणि दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर कितपत असावा या विषयी सखोल मार्गदर्शन त्यानी यावेळी केले. ♦ श्री. सुरेश भारती सर यानी ब्लॉग कसा बनवावा? वीडियो निर्मिती कशी करावी? ड्राइव चा वापर कसा करावा? ड्राइव मध्ये फ़ाइल अपलोड कशी करावी? फाइल शेयर कशी करावी? जीमेल मधील बारकावे? cc, bcc, compose याबाबत मार्गदर्शन केले. ♦यूटयूब चा प्रभावी कसा वापर करावा? यूटयूब वर वीडियो कसे अपलोड करावे? वीडियो कसा डाउनलोड कसा करावा? याबाबत श्री. गोरक्ष पावडे सर यानी मार्गदर्शन केले. ♦ Elearning काय आहे? elearning सुरु करण्यासाठी आवश्यक साहित्य काय आवश्यक आहे? elearning कशासाठी यावर श्री. लक्ष्मण नरसाळे सर यानी मार्गदर्शन केले. ♦MAGIC फोल्डर यात अप्रगत मूल मुक्त शाळा, दप्तरमुक्त शाळा, तसेच मूल घडविताना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. ♦ शिक्षकांना सर्व गोष्टी प्रात्यक्षिकासह शिकता आल्यामुळे त्याना नविन शिकता आले याचा आनंद चेहऱ्या वरुण ओसंडून वाहताना दिसून आला. ♦ शिक्षकांच्या तंत्रज्ञान विषयक शंका यावेळी सोडवण्यात आल्या. त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. ♦सदर कार्यशाळेला राज्याचे शिक्षण सचीव श्री.नंदकुमार साहेब यानी शिक्षकांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले त्यामुळे शिक्षक प्रेरित झाल्याचे दिसून आले. ♦अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली.... धन्यवाद..! 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 शब्दांकन उमेश कोटलवार 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Friday, October 23, 2015

मूल समजून घेताना-सोमनाथ वाळके

नमस्कार🙏💐💐 आज दिनांक 18 ऑक्टोबेर रोजी कर्जत जि अहमदनगर येथे इंडियन बहुजन टीचर्स शाखा कर्जत यांच्या वतीने "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व् तंत्रस्नेही कार्यशाळा "आयोजित केलि होती या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सोमनाथ वाळके(तंत्रस्नेही शिक्षक मार्गदर्शक) व् श्री रामदास काटे (म रा अभ्यासक्रम निर्मिति मंडळ सदस्य)हे होते 🔷सोमनाथ वाळके🔷 🔶eLearning म्हणजे काय ?त्याचा वापर प्रत्येक्ष अध्ययन अध्यापनात वापर कसा करावा ,किती प्रमाणात करावा याविषयी सविस्तर माहिती दिली 🔶वर्गामधे प्रत्येक्ष अध्यापन करताना कोणत्या साहित्याचा वापर करावा कोणते साहित्य तयार करावे याविषयी मार्गदर्शन केले 🔶अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा ह्या संगणक असलेल्या शाळा आहेत त्यामुळे सर्व शिक्षकानी त्याचा पुरेपूर वापर करावा 🔶मूल समजून घेताना या विषयावर बोलताना त्यांनी सोप्या सोप्या पण फार महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला 🔶मूल समजून घेत असताना आपल्या PPT च्या सहाय्याने घर ,शाळा,समाज,सहकारी या सर्व गोष्टिनचा मुलावर होणारा परिणाम व् फायदे समर्पक शब्दात सांगितले 🔶आपली शाळा पेपरलेस कशी बनवावी ,शैक्षणिक ऍप याविषयी माहिती दिली 🔶या कार्यशाळेत त्यांनी विविध दाखले देत शिक्षक कसा असावा या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले 🔶रामदास काटे यांनी शिक्षणातील तंत्र ज्ञानाचे महत्व समजावून सांगून त्याचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले 🔶त्याच बरोबर विविध नवोपक्रम याविषयी मार्गदर्शन केले 🔶कार्यक्रमाच्या शेवटी मा शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांनी उपस्थित शिक्षकांशी फोन वरुण संवाद साधला 🔶मा सचिव साहेबांच्या संवदामुळे उपस्थित लोक भारवून गेले 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कार्यशाळेनंतर इब्टाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली या मधे अविनाश घोड़के यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली 🌴🌴🌴🌴🌴 संकलन विक्रम अडसुळ

गणित प्रश्नपत्रिका आराखडा कार्यशाळा -ज्योती बलव

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) नमस्कार 👏 दि.८ व ९ आँक्टोंबर रोजी SCERT पुणे येथे संकलित १ चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका विकसन आराखडा ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेस मला निमंत्रित केले होते त्याचा अनुभव व महत्वाचे मुद्दे 👇👇👇👇👇👇👇👇 प्रथम सप्टेंबर मध्ये झालेल्या पायाभूत चाचणीचे अनुभव आणि अडचणी व त्रुटी यांवर चर्चा करुन ..पुढील संकलित १ चाचणीत त्या त्रुटी पुन्हा न होण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले. पायाभूत चाचणी नोव्हेंबर मध्ये झाल्याने अध्यापनासाठी पुरेसा कालावधी मिळण्यासाठी संकलित १ चाचणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे ठरले. फ़क्त (भाषा आणि गणित) उरलेल्या चार विषयांची संकलित चाचणी १ नेहमीप्रमाणे दिवाळीच्या सुट्टी पुर्वी घेण्याचे ठरले. भाषा व गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका SCERT कडून मिळतील. संकलित १ च्या प्रश्नपत्रिकेत A आणि B असे दोन विभाग असतील. त्यापैकी A विभागात पायाभूतवर आधारित प्रश्न असतील तर B विभागात इ.१ली ते ८ वी च्या अनुषंगाने त्या इयत्तेतील प्रथम सत्रावरील घटकावर आधारित प्रश्न असतील. संकलित १ चाचणीसाठी पायाभूतवर आधारित ४०% तर इयत्तेच्या प्रथम सत्रातील घटकावर ६०% प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिकेत प्रथम सत्रातील सर्व घटकांचा सामावेश करावा. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे क्षेत्र ,घटक,उपघटक, प्रश्नातील तपासायचा मुद्दा, गुण इ.बाबी नमुद करावेत. प्रश्नपत्रिका तयार करताना सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा ..शहरी , ग्रामीण इ.बाबींचा विचार करुन काढावी. प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न आव्हानात्मक असतील. कार्यशाळेच्या पुढील बैठकीत या आराखड्यात नमुना प्रश्नपत्रिका तयार करुन त्यावर चर्चा करुन अंतिम प्रश्नपत्रिका कशी असावी हे ठरविण्यात येईल. नंतर याच प्रश्नपत्रिका इतर भाषेत अनुवादित करण्याचे ठरले. ज्योती दिपक बेलवले . जि.प.शाळा केवणीदिवे . ता.भिवंडी ..जि.ठाणे. कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)

जुन्या बांगड्या पासून कलाकृति

जुन्या बांगड्यांपासुन व वर्तमानपत्रांपासुन तयार केलेल्या टोपल्या. जुन्या बांगड्या सेलोटेपने फोटोत दाखवल्याप्रमाणे चिटकवल्या. प्रेजेंट पेपर किंवा कोणताही टाकाऊ आकर्षक पेपर लावून टोपली तयार केली. या टोपलीचा उपयोग फुले ठेवण्यासाठी होऊ शकतो.ह्या टोपलीत जास्त वजनाच्या वस्तू ठेवू नयेत. जुन्या वर्तमानपत्र पत्राच्या कागदाची घडी घालून त्या एकमेकांवर रचून ..घड्यांचे छोटे रोल करुन ते एकमेकांवर चिटकवून ..अशा विविध आकाराच्या टोपल्या तयार करुन त्या रंगवल्या. या टोपल्या लहान ,मोठ्या कशाही बनवता येतात. या मजबूत असल्याने यात फळे,भाज्या इ. वजनाने भारी वस्तू देखील ठेवू शकतो.

उगवली सोनियाची सकाळ-ज्योती बेलवले

♦♦♦♦♦♦♦♦♦ सोनियाची उगवली सकाळ...... दासऱ्याच्या मुहूर्तावर् चराचापाड़ा अघई ,ठाणे येथील मुलांनी लुटले आनंदांचे सोने...... 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 शाळा म्हणले की आपल्या समोर येते ती चार भिंतीची इमारत, पाण्याची टाकी , किचन शेड विविध सुविधा असणारी इमारत... पण चराचा पाडा शाळा या सर्व गोष्टींना अपवाद... भारतात सर्व शिक्षा अभियान आले आणि वाड्या ,वस्ती ,पाडयावरील मुलांची शिक्षणाची सोय झाली अशीच चराचा पाडा शाळा वस्ती शाळा म्हणून 2005 साली सुरु झाली 2008 मधे जि प शाळेत सदरील शाळेचे रूपांतर झाले पण..... सदर पाडा हां तानसा अभयारण्य क्षेत्रात मोडत असल्यामुळे शासनाच्या सर्व भौतिक सुविधानपासून वंचित राहिला कारण फॉरेस्ट च्या नियमानुसार येथे कोणतीही भौतिक सुविधा करता येत नव्हती... पक्की इमारत बांधयची म्हणले तर फॉरेस्ट मुळे बांधने अशक्य... या शाळेवर जायला रस्ता ही नाही लोकांचा मुख्य व्यवसाय जंगलातील पाने गोळा करणे ,कसलिही भौतिक सुविधा नाही,इलेक्ट्रिसिटी ही नाही अश्या या अगदी रस्ता नसलेल्या पाड्याला "जिद्दीचि पाऊलवाट" निर्माण केली ती इथे ज्ञान दानाचे पवित्र काम करणाऱ्या जिद्दी, मेहनती ,निस्वार्थी शिक्षकांनी 👇👇👇👇👇👇👇👇👇 या शाळेवर दिपक बेलवले व् विष्णु सोगीर हे शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत त्यांनी शाळेची गुणवत्ता उत्तम राखली आहे,पण इच्छा असूनही गरीबांच्या लेकरांना शाळेचे छत देवु शकत नव्हते, त्यांचे प्रयत्न चालूच होते अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश आले म्हणतात ना... "अपयशाला खचुन न जाता काम करतो तोच खरा शिक्षक" अखेर या पाडयावरील शाळेच्या मदतीला मुंबई येथील "लक्ष्य"फाउंडेशन ही संस्था आली .त्यांनी पाडयावरील सर्व परिस्थीती जाणून घेतली व् आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी फॉरेस्टचे नियम न मोड़ता फैब्रिकेटेड इंफ्रास्ट्रेचर असणारी शाळेची इमारत बांधून दिली धन्यवाद "लक्ष्य "संस्था आणि तिच्या परिवरातील सदस्यांचे या कार्यक्रमासाठी मुद्दामहुन मला ही निमंत्रण दिले होते कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला आमचा दोघांचा सपत्नीक सत्कार केला त्यावेळेस माझे ही मन हेलावुन गेले ........ कारण हा सत्कार आमच्यासाठी राष्ट्रपती यांच्या कडून मिळणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारापेक्षा ही मोठा होता . या कार्यक्रमासाठी लक्ष्य फाउंडेशन चे सौ फाल्गुनी व् श्री हितेषभाई पिठवा सौ अल्पा व् श्री विशालभाई देढिया सौ दीप्ती व् श्री मयुरभाई परमार सौ कौशल व् श्री विधिनभाई वाघेला श्री दिलीपभाई डोडीया सुभेद्रभाई पड़ियाची सौ भावनाबेन डोडिया केवल देढिया,जगदीश पटेल हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी दीपक बेलवले यांनी फाउंडेशन चे शतशः आभार मानले फाउंडेशन ने सर्व मुलांसाठी शालेय किट चे वाटप केले या वेळी त्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद फार काही सांगत होता.. पुनश्च एकदा शाळेत काम करणाऱ्या त्या शिक्षकांना मानाचा सलाम करते 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संकलन ज्योती दिपक बेलवले 🌺🌺🌺🌺🌺🍁🌺🌺

Tuesday, October 6, 2015

गणित प्रश्नसंच निर्मिती

सर्वांना नमस्कार, इयत्ता 1 ते 8 साठी प्रश्नसंच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्यापरिषद), पुणे वेबसाईटवर http://www.mscert.org.in/QuestionBank.aspx (विद्यापरिषदेचे तज्ज्ञ व अधिकारी, नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनमधील तज्ज्ञ, डाएटमधील प्राध्यापक व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून हे प्रश्नसंच तयार केलेले आहेत.) अपलोड करणे सुरू झाले आहे. पायाभूत चाचण्या बऱ्याच ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळण्यात, वेळापत्रकात, चाचणी घेण्यात, तपासण्याच्या पद्धतीत काही अडचणी आल्या आहेत असे समजते. त्यातील जास्तीत जास्त अडचणी आपण पुढील वेळी दुरूस्त करू. सगळीकडून एक मत मात्र ऐकायला मिळत आहे आणि ते म्हणजे या चाचण्यांमधील प्रश्न फार चांगले आहेत. मुलांबद्दल नेमकी माहिती समजते आहे. ज्या मुलांना काहीच येत नाही असे वाटते त्यांना काय काय येते हे देखील चाचणीतून समजत आहे. आपल्या वर्गाची अडचण नेमकी काय आहे ते ओळखायला शिक्षकाला मदत होईल अशा प्रकारचे प्रश्न यात आहेत. या प्रश्नांचे शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. अशा प्रकारचे प्रश्न असलेले प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची सूचनाही अनेकांनी केली. त्यासाठी गणिताचे प्रश्नसंच तयार करीत आहोत. यात अभ्यासक्रमातील क्षेत्रांनुसार प्रश्नसंच आहेत. इयत्तावार पाठ्यपुस्तकाचा संदर्भही दिलेला आहे. काही संकल्पनांचे प्रश्न मात्र एकत्रितपणे दिलेले आहेत. सध्या प्रामुख्याने पहिल्या सत्राचे मराठी माध्यमाचे काम केलेले आहे. इतर माध्यमांचे आणि इतर प्रश्नसंचांचे काम टप्प्याटप्प्याने करून वेबसाइटवर अपलोड केले जाईल. प्रात्यक्षिक, तोंडी, लेखी असे तीनही प्रकारचे प्रश्न यात आहेत. प्रश्न सोडवता सोडवता संकल्पना व कौशल्ये विकसित व्हावीत असेही प्रश्न यात आहेत. काही ठिकाणी कॅलक्युलेटरचा उपयोग करण्यास सुचविले आहे. उदा. निरनिराळ्या वर्तुळाकार वस्तूंचा परीघ आणि व्यास मुलांनी स्वतः मोजावा, त्यांचे गुणोत्तर कॅलक्युलेटर वापरून काढावे, सर्व वर्तुळांना ते गुणोत्तर जवळपास सारखे येते याचा अनुभव स्वतः घेऊन अचंबित व्हावे आणि त्यांचे पुढे आणखी शोध घेण्याचे कुतुहल वाढावे असा प्रयत्न आहे. दशांशांचा भागाकार ही क्षमता या अनुभवात प्राधान्याची मानलेली नाही आणि म्हणून कॅलक्युलेटर वापरावयास सांगितले आहे. दशांशाचा सराव हा स्वतंत्रपणे घ्यावा, परंतु नव्या अनुभवातला तो अडथळा बनू नये असा विचार यामागे आहे. आकडेमोडीत न अडकता एखाद्या नव्या संकल्पनेतली प्रक्रिया आणि रीत याकडे मुलांचे लक्ष वेधता यावे यासाठीही काही ठिकाणी कॅलक्युलेटरचा वापर सुचवलेला आहे. मूळ अवयव पाडणे, घातांक. अपरिमेय संख्या यासारख्या संकल्पना शिकताना उपयोगी पडणारे साधन म्हणून तो वापर केलेला आहे. पाठ्यपुस्तकांमधील प्रश्नांचा संदर्भही या प्रश्नसंचांमध्ये दिलेला आहे. ते प्रश्नही करून घ्यावेत. या प्रश्नसंचातलेच प्रश्न संकलित 1 व 2 ला येतील असे नाही. या प्रकारचे किंवा यापेक्षा निराळे प्रश्नही येऊ शकतील. परंतु या प्रश्नांचा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना फायदा होईल अशी खात्री वाटते. या प्रकारचे प्रश्न मुलांच्या परिसराशी जोडून, मुलांची नावे वापरून विचारावेत. या सत्रातही मुलांना त्यांचा फायदा व्हावा यासाठी जसजसे प्रश्नसंच तयार होतील तसतसे ते वेबसाइटवर अपलोड करणार आहोत. हे ‘work in progress’ आहे. त्यात आपल्या सूचनांचेही स्वागत आहे. जसजसे सुधारित प्रश्नसंच तयार होतील तसतसे ते अपलोड करीत जाऊ. आपण सर्व मिळून हे प्रश्नसंच अधिकाधिक चांगले करीत जाऊ आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय गाठू. हे प्रश्नसंच वापरताना काही अडचण आल्यास पुढील इमेलवर संपर्क साधावा -questionbankmscert@gmail.com फोन नं. 8275202366 नंदकुमार प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग. हे प्रश्नसंच तयार करण्यात विद्यापरिषदेतील तज्ज्ञ व अधिकारी यांच्याबरोबर सहभागी व्यक्ती - डाएटमधील प्राध्यापक – डॉ. चंद्रकांत डी. साळुंखे शासकीय शाळांमधील शिक्षक – 1) शशिकला एकनाथ पाटील 2) जितेंद्रसिंग कल्याणसिंग पाटील 3) अनिल डी. चाचर 4) सुधीर आर. जगताप 5) सचिन विश्वनाथ पाटील 6) ज्योती दीपक बेलवले 7) मंगल निवृत्ती पवार 8) विक्रम सोनबा अडसूळ 9) सरिता सदाशिव फडके 10) विकास देवके 11) बाळासाहेव नामदेव भोसले 12) सोमनाथ वामन वाळके अनुदानित शाळांमधील शिक्षक – 1) निवृत्त - अलका साठे 2) रोहिणी रामदास मिठे 3) महेंद्र सोनजी नेमाडे नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनमधील तज्ज्ञ – 1) डॉ. विवेक मॉंटेरो 2) गीता महाशब्दे 3) विपुला अभ्यंकर

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल