Tuesday, August 2, 2016

पुणे विभागीय शिक्षण परिषद-बारामती

*बारामती शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*दि 24 व 25 जुलै 2015 या  कालावधीतअहमदनगर,सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यातील केंद्रप्रमुख,विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची दोन दिवशीय विभागीय कार्यशाळा पार पडली.वास्तविक पाहता यातील मी कसलाही* *प्रशासकीय अधिकारी नाही तरीही मला या कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब यांनी दिली त्याबद्दल साहेबांचे प्रथमतः आभार व धन्यवाद*
🙏🙏🙏🙏

पहिल्या दिवशी काही शाळा तसेच केंद्र स्तर व गटस्तरावरील सादरीकरण झाले ,प्रथम दिवशी *आदरणीय नामदेवराव जरग साहेब* दिवसभर कार्यशाळेसाठी उपस्थित होते.साहेबानी अगदी समर्पक असे प्रश्न विचारत सभागृह बोलते केले आणि प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी आपण काय केले पाहिजे हे त्यांनी त्यांच्या समर्पक शब्दात सांगितले

त्याचबरोबर *आदरणीय दिनकर टेमकर साहेब* हे ही या परिषदेसाठी दोन दिवस उपस्थित होते,त्यांनी हि सभागृहाला योग्य असे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी त्यांच्या सेवाकाळातील काही उदाहरणे देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आलेल्या प्रसंगांना कसे सामोरे गेले हे त्यांनी सांगितले .आदरणीय साहेबानी दिलेल्या उदाहरनांपैकी नांदेड जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी असताना फोन वर घडलेला किस्सा सांगितला आणि सभागृहात एकच हस्या पिकला
आदरणीय साहेबानी या परिषदेसाठी फार कष्ट घेऊन परिषद यशस्वी केली

जिल्हास्तारावरील सादरीकरणात *आदरणीय अशोक कडूस (शिक्षणाधिकारी अहमदनगर)* *मुस्ताक शेख(शिक्षणाधिकारी* पुणे) ,घाटगे साहेब (शिक्षणाधिकारी सोलापूर)  तसेच डायट प्राचार्या मेटे मॅडम व औटें मॅडम यांनी सादरीकरण केले ,यामध्ये प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेतला
आदरणीय कडूस साहेब यांनी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक मूल शिकण्यासाठी काय केले ?
काय करत आहे ? पुढील दिशा समजावून सांगितली

 गटस्तरावरील सादरीकरणात
पंढरपूरच्या *गटशिक्षणाधिकारी *सुलभा वठारे मॅडम,नेवासा गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम,* यांनी आपल्या कार्याचा आलेख सांगितलं तसेच पंढरपूर मधील दत्तक शाळा उपक्रम फारच सकारात्मक वाटला

तसेच नेवासा तालुका राजकीय व शिक्षक संघटनात्मक संवेदनशील असूनही एक महिला अधिकारी म्हणून करत असलेल्या कामाची पद्धत सर्वाना एक नवी उमेद देत होती

वाबळेवाडी व पावरवाडी या शाळेनी आपल्या शाळेचे सादरीकरण केले

दुसऱ्या दिवशी केंद्र स्तरावरील सादरीकरण झाले

पूर्णा तालुक्याचे *गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे साहेब* यांनी त्यांच्या खड्या आवाजातील मार्गदर्शनात काम कसे करावे व काम कश्यासाठी करायचे हे समजावून सांगितलं
शेवटी साहेबानी वामनदादा कर्डक यांची कविता गायन करून सभागृहामध्ये नवचैतन्य निर्माण केले
बऱ्याच दिवसाची साहेबांनी गायलेली कविता ऐकायची इच्छा पूर्ण झाली

त्याच बरोबर गेवराईचे विस्तार अधिकारी प्रेरणादायी व्यक्तिमत्व *काळम पाटील साहेब* यांनी त्यांनी लोकसहभाग कसा जमवला हे सांगून व काम कसे केले याविषयी मार्गदर्शन केले


अचानक सभागृहात प्रवेश झाला तो स्फूर्तीचा अखंड झरा असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील आधुनिक सावित्रीचा म्हणजेच..

*लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे* यांचा
तृप्ती ताईंनी अगदी मोजक्या शब्दात आपल्या कार्याची माहिती देऊन सभागृहातील सर्वाना काम करत रहा हे सांगितले

दुपारी एक वाजता आदरणीय
*शिक्षण संचालक नांदेडे साहेब व शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* आले
या मान्यवरांच्या समोर मला सादरीकरण करण्याची संधी मिळाली हे मी माझे
भाग्य समजतो

आदरणीय नांदेडे साहेब यांनी अगदी प्रेरणादायी शब्दात सम्पूर्ण सभागृहाला काम करण्याची प्रेरणा दिली,प्रत्येकाच्या मनामध्ये एक ऊर्जित अवस्था निर्माण केली
आभाळा एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व पण  कसलाही मी पणा नाही कि पदाचा गर्व नाही
साहेबांकडून खूप काही शिकता आले,साहेबानी मूल शिकलं पाहिजे याचे आवाहन केले

*शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* यांनी त्यांच्या शैलीमध्ये उपस्थित सभागृहाला  विविध उदाहरणाचा दाखल देत मार्गदर्शन केले यातील साहेबांचे रेल्वे ने प्रवास करणाऱ्या मुलगा वडील आणि गाडीतील सहप्रवाश्याचे उदाहरण देऊन लोकांच्या मनामध्ये नवचैत्यन निर्माण केले
*तसेच प्रगत मधील प्र म्हणजे*
*प्रेरणा ,प्रयत्न व प्रगती या* शब्दात वर्णन केले

या परिषदेसाठी आंग्लभाषा औरंगाबाद चे कांबळे साहेब ही दोन दिवस उपस्थित होते

या परिषदेच्या  नियोजनासाठी ज्यांनी मेहनत घेतली अश्या हवेलीच्या *गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार मॅडम* यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन

प्रत्येक परिसंवाद सादरीकरणाचे नियोजन अगदी सुंदर असे केले
त्याच बरोबर *संगीता शिंदे मॅडम* यांनी त्यांना छान अशी साथ दिली

तसेच पुण्याचे *उपशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे साहेब* व इंदापुरचे गटशिक्षणाधिकारी गुरव साहेब यांनी
 आपल्या अनुभवाच्या आधारे अतिशय कार्यकुशलतेने परिषदेचे आयोजन केले आणि नियोजनबद्ध पद्धतीने  अंमलबजावणी केली. आज पुन्हा त्याच्यातील  कुशलनेतृत्व दिसले.
एकंदरीतच ही दोन दिवशीय शिक्षण परिषद फारच सकारात्मक झाली.या दोन दिवसात खूप काही शिकता आले

*ही परिषद माझ्यासाठी खुप प्रेरणादायी ठरली कारण आपण करत असल्या कामाची पावती आज मिळाली*


यापेक्षा वेगळा काय आनंद असू शकतो
🙏🙏🙏🙏🙏

*विक्रम अडसूळ*
*कर्जत अहमदनगर*
*मोबा.9923715464*

शालेयाचा पहिला दिनु..

*शालेयाचा पहिला दिनु....*
💐💐💐💐💐💐💐

आज दिनांक 15 जून शाळेचा पहिला दिवस सर्व जण अपडेट..

इयत्ता पहिलीमध्ये  मुलांना प्रवेश दिला ,पहिल्या दिवशी उपस्थिती 100%

बंडगरवस्ती म्हणजे 18 ते 19 घरांची वस्ती...
वस्तीवरून प्रवेश फेरी काढली
नवागतांचे स्वागत  इयत्ता चौथीतील  मुलींनी औक्षण घालून केले..

नवीन पुस्तके..
नवीन कपडे..
नवे मित्र..
नवे ठिकाण...
सर्व काही नवे नवे..

स्वागत,गणवेश वाटप व पुस्तक वाटप कार्यक्रम झाल्यावर जिलेबी आणि फरसानाची मेजवानी...त्यात पुन्हा शाळेचा पुलाव...मुलांनी मनसोक्त आनंद लुटत जेवणाचा आस्वाद घेतला..

दुपारनंतर मोठ्या वर्गातील मुलांनी नवीन पुस्तके हातात घेतली तर पहिलीच्या मुलांनी घेतली मांडणीवरील खेळणी..

कुणी ट्रक गाडी तर कुणी गोट्या,चेंडू ....

स्वारी खेळता खेळता दमली अन....
नवीनच जीवनाची वाट चालण्यासाठी सज्ज झालेले दोन जवान वर्गातच चटईवर आडवे झाले..
आम्ही ही त्यांना काही ही न बोलता त्यांची झोप होऊ दिली

खरच किती लहान मुले ती ...

वस्तीवरील बुजुर्ग येऊन सांगू लागले गुरुजी साळला सुटी होती तर लय सूनं सुनं वाटत होतं..

 आता कस भरल्यासारखं वाटतय बघा....

आम्ही ही सुखावलो कारण आजपासून पुन्हा आपल्या समोरील चिमुकले नवीन काही शिकण्यासाठी , आम्हाला शिकविण्यासाठी तयार झाली आहेत...

आता आपली जबाबदारी वाढली आहे....
हे मात्र नकी...

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
जि प प्राथ शाळा बंडगरवस्ती
ता कर्जत जि अहमदनगर

Monday, August 1, 2016

ATM राज्यस्तरीय शिक्षण सम्मेलन शिर्डी

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) चे राज्यस्तरीय शिक्षण संमेलन संपन्न .
कोकमठाण शिर्डी (दि.१५)-
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे दोन दिवशीय शिक्षण संमेलन दिनांक १४ व १५ मे रोजी कोकमठाण शिर्डी येथील आत्मा मलिक सभागृहात संपन्न झाले .
     व्हाॕट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक प्रेरणादायी व स्वसक्षमीकरणासाठी  विशाल कार्य व रचनात्मक काम ATM ने उभे केले आहे.महाराष्ट्रातील कानाकोप-यातून शिक्षक,शिक्षिका  स्व खर्चाने ,सुट्टीअसूनही संमेलनासाठी आले होते.
संमेलनातील ठळक बाबी:-
दिवस १ला:-
कार्यक्रमाचे उदघाटन सूर्यवंशी साहेब ,व्यवस्थापक आत्मा मलिक ट्रस्ट तथा माजी उपशिक्षणाधिकारी , धुळे ,ह.ना.जगताप व ATM चे आयोजक विक्रम अडसुळ यांचे हस्ते झाले.
प्रास्तविकात विक्रम अडसुळ यांनी शैक्षणिक संमेलन आयोजनाची भूमिका स्पष्ट केली .
१.मा.ह.ना.जगताप (मानसशास्त्रीय अभ्यासक) यांनी ताण तणावाचे व्यवस्थापण या विषयावर मार्गदर्शन केले.
२.सोमनाथ वाळके सरांनी  "मूल समजून घेताना" हा विषय खूप सोप्या पद्धतीने मांडला.
३."शिक्षणातील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर " या परिसंवादात सुनिल अलुरकर,रणजितसिंह डिसले,स्वरदा खेडकर,अनिल कांबळे,अनिल सोनुने यांनी
 सहभाग घेऊन प्रभावीपणे समजावले.
४."माझी शाळा माझे उपक्रम " या सदरात ज्योति बेलवले,ज्ञानदेव नवसरे,मंगल पवार,दिपाली बाभूळगांवकर,अलका धांडे,पौर्णिमा राणे,जयमाला मुळीक यांनी आपल्या शाळेत राबवित असलेल्या उपक्रमाबाबत निवेदन केले.
५."शाळा प्रगत करताना  " या विषयाच्या परिसंवादात स्नेहा मगदुम,कविता बंडगर,किशोर गर्जे,ज्ञानेश्वर इंगळे,मनिषा पांढरे ,महेश घुगरे यांनी स्वानुभव कथन केले.
६.मुंबईचे शिक्षणनिरीक्षक अनिल साबळे साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थामधील शाळा बदलत असल्याचे स्पष्ट केले.
७.प्रथम दिवसाचा समारोप महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक मा.गोविंद नांदेडे साहेबांच्या प्रकट मुलाखतीने झाला .विक्रम अडसुळ व ज्योति बेलवले यांनी सुंदर मुलाखत घेतली .साहेबांनी आपला खडतर जीवनपट मनमोकळेपणे विषद केला.साहेबांचा प्रत्येक शब्द प्रेरणादायी होता.

दिवस २रा :-
१."रचनावाद समजून घेताना " या विषयावर ग्राममंलचे डाॕ .रमेश पानसे यांनी यांनी चिकित्सक बाबी मांडल्या .
२.अवघ्या महाराष्ट्रासाठी ज्ञानपंढरी कुमठे बीटला बनविणा-या प्रतिभाताई भराडे मँडम यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व मेंदूचा अभ्यास सुंदर शब्दांत व्यक्त केला .
३.वंचितांचे शिक्षण व RTE  या परिसंवादात संदीप वाघचौरे,मतीन भोसले ,मनिषा जराड,संतोष मुसळे,दत्ता अम्रित यांनी भाग घेतला .
४."इंग्रजी अध्यापनात मातृभाषेचा वापर करावा की नको " या विषयावर म.रा.पा.नि.मंडळ सदस्य नदीम खान,प्रिती खांडेलवार,अरुणा उदावंत,प्रभाकर लोंढे,नारायण मंगलाराम,गजानन उदार,प्रशांत शेवतकर यांनी विचार मांडले.
५."शैक्षणिक गुणवत्तेत शिक्षकांचे स्वसक्षमीकरण " या विषयाच्या परिसंवादात महाराष्ट्राचे गुणवत्ता प्रेरक सोमनाथ वाळके, म.रा.पा.नि.मंडळ सदस्य समाधान शिकेतोड,आदर्श शाळा जरेवाडीचे अजय घोडके,ISO शाळा रजापूर चे संजय खाडे यांनी विचार मांडले.QR कोड पाठ्यपुस्तकांत आणणारे रणजिंतसिंह डीसले यांनी सुत्रसंचलन केले.
शिक्षकांचे मनोगतात भरत काळे यांनी शिक्षकांची अशी संमेलन आवश्यक असल्याचे सांगितले .
६.लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मँडम यांनी भ्रमणध्वनीद्वारे शिक्षकांना शुभेच्छा दिल्या .
७.कृतिशील शिक्षक महाराष्ट्र  परिवाराचे संयोजक विक्रम अडसुळ सरांनी ATM ची भूमिका स्पष्ट करुन समारोप केला .
सकाळी ९ पासून रात्री १० पर्यंत एक एक मिनिट वाया न जाऊ देता इथे ज्ञान यज्ञ पार पडला.मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा वेळ बसून श्रवण केले असे बरेच बोलत होते.श्रवण  ,मनन,चिंतन,निवेदन अशा बाबीत वेळ कुठे गेला हे कळलेच नाही. औरंगाबादहून राजू कोळी, रमेश परदेशी ,हाशम शहा,सत्यवान हरेल, मोहन राख,मनोहर नागरे ,गिरीश क्षिरसागर , भरत काळे,नारायण मंगलारम,संजय खाडे आम्ही दहा शिलेदार उपस्थित राहिलो .भरभरुन शिकायला मिळाले.शिक्षकांनी शिक्षकांसाठी शिक्षकांचे भरवलेले हे शैक्षणिक संमेलन ऐतिहासिक ठरले आहे.
     ⚽शब्दांकन⚽
  संजय खाडे ,औरंगाबाद .

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल