Tuesday, December 1, 2015

भावना



विज्ञानाला इथं उरला नाही थारा,
भाकड कथांचा सांगितला जातो गोषवारा,
तर्काला इथे नाही मुभा ,
नावालाच घेतात मोठमोठ्या महासभा ,
मग खर बोललं कि यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेर निघतात !!


कशाला हवी अशी संस्कृती ,
जी वापरू देत नाही आपली मती ,
जी थांबवेल विकासाची गती ,
संस्कृती विषयी बोललं की यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेर निघतात !!

इथले थोतांड समजवायला अंतराळातून PK आला ,
तरी तुमचा बुद्धिप्रामाण्यवाद सांगा पाहू कोठे गेला ,
म्हणत worng number,worng number
तोडली त्याने सर्वाचीच कंबर ,
PKसारखा चित्रपट आला की यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!

आसाराम रामपाल सारखे भोंदू बलात्कारी ,
स्वतः लाच म्हणतात आम्ही चमत्कारी ,
सोडायला लावतात आपल्याला वज्ञानाची कास ,
सहजच करतात इतिहासच विपर्यास ,
मग खरा इतिहास सांगितलं कि यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!

मंत्राने होतात होतात इथे लोकांचे आजार बरे ,
मग मेडिकल एंट्रान्सचे cut off इतके high का बरे ?

जरा डोकं लावलं तरी यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!

सांगून गेले अनेक संत एकच मर्म ,
कर्मा पेक्षा श्रेष्ठ नाही तो धर्म ,
जो कोणाला देतो जन्मजात सत्तेची गादी ,
तर कोणाला ठरवतो आतंकवादी ,
मग धर्मा विषयी बोललं कि यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!

कधी गांधी ,कधी दाभोलकर ,कधी पानसरे ....
अरे इतक्याने काय होणार ?
पेटून उठलोय आम्ही सारे ,
तुमच्या त्या गोळीने देह संपेल कदाचित ,
पण विचारांच्या बाबतीत आम्ही राहू अपराजित ...


आता तरी तुमच्या या भावनांना आवरा ..
दुभंगला देश आता तरी सावरा..


सुमित जाधव
B E Mech
दौंड
9403772774

No comments:

Post a Comment

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल