Thursday, November 26, 2015

मूल कसं शिकतं भाग -2

मूल कसं शिकतं

भाग -2

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मूल शिकत असताना आपण बारकाइने पाहिले तर वरील गोष्टींचा
अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येते की मूल त्याचे ते ... शिकता शिकता शिकते.
त्याच्या कड़े असलेल्या अनुभवाच्या ,पूर्व ज्ञानाच्या आधारे ते विविध कृतीतुन शिकते हे आपल्या लक्षात येते.
 मूल प्रत्येक ठिकाणी शिकत असते.
शाळा, निसर्ग ,परिसर ,समाज व सहकारी यांच्याकडून खुप काही शिकत असते ...
नव्हे वरील घटकांचा परिणाम त्याच्यावर शिकत असताना होत असतो.

🔷शिकणे म्हणजे काय ?असा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर आपल्या असे लक्षात येते की शिकणे ही एक कृतीशिल प्रक्रिया आहे, कारण मूल हे कृतीतुन शिकत असतं अस बऱ्याच शिक्षण तज्ञांचे मत आहे.

🔷ज्यावेळेस मूल शिकत असत त्यावेळेस त्याच्याकड़े काही अनुभव असतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर ते अधिक प्रभावी पणे शिकत असत. विविध अनुभव त्याने जन्मापासून घेतलेले असतात. फ़क्त या काळात वयाचा विचार होणे फार गरजेचे असते.

🔷 प्रत्येक शिक्षकाची अशी मानसिकता असते की माझ्या शाळेतील मूल शिकलं पाहीजे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने त्या मुलास प्रत्यक्ष  वस्तु हाताळायला देणे गरजेचे आहे असे मला वाटते.

🔷 शिकणे आणि शिकायला शिकणे या दोन गोष्टी  वेगळ्या आहेत.कोणतीही गोष्ट  शिकायची असेल तर त्यामधे प्रत्यक्ष सहभाग असणे महत्वाचे  असतं ,कारण माणूस जेव्हा शिकत असतो तेव्हा मानवी मेंदुमधे नव्या पेशीजलिका निर्माण होत असतात .ज्या माणसाला शिकण्यासाठी उपयोगी पडतात आणि यातूनच शिकण्याची क्षमता ही विकसित होत असते.

🔷शिकणे ही प्रक्रिया व्यक्तिगत घडणारी घटना आहे. ही प्रक्रिया घडत असताना आपण फ़क्त वाचन म्हणजे शिक्षण असे न करता पुस्तका बाहेर ही भरपुर ज्ञान मिळत असते  हे तत्व स्विकारुन त्याला समाजात ही वावरु दिले पाहीजे .कारण बालक समाजात ही भरपूर काही शिकत असते.

🔷ज्यावेळेस मूल शिकत असते  त्यावेळेस भाषा हां घटक फार महत्वाचा असतो.
कारण मातृभाषेतून विविध संकल्पना मूल लवकर समजून घेते.
त्यामुळे प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण दिले गेले पाहीजे.

🔷मूल शिकत असताना विविध अडचणी त्याला येत असतात आणि येणाऱ्या अडचणी कश्या सोडवायच्या यावर ते विचार करत करत शिकत असते
म्हणजेच नविन आव्हाने बलकाला शिकन्यास प्रवृत्त करत असतात

🔷 शिकणे ही एक सतत चालनारी प्रक्रिया आहे .पण पालक व् समाज यांची असी मानशिकता तयार झालेली आहे की मूल शाळेत आले की लगेच त्याला आले पाहीजे त्याने लगेच सर्व क्षमता प्राप्त केल्या पाहिजेत परन्तु आपन एक गोष्ठ लक्षात घेतली पाहीजे की शिकणे ही निरंतर चालनारी प्रक्रिया आहे
त्यामुळे बालकाला शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला पाहीजे

🔷ज्यावेळेस बालक शिकत असते त्यावेळेस इतरांची नकळत मदत घेत असते
वायगोटस्की म्हणतो-
मुलांच्या शिक्षणाला प्रौढांची मदत होत असते
🔷ज्यावेळेस बालक शिकत असते त्यावेळेस त्याची भावनिक स्थिरता महत्वाची असते कारण भावनिक स्थिरता नसेल तर मूल नाही शिकु शकत


वरील सर्व बाबींचा शिक्षकानी बारकाइने अभ्यास केल्यास किंवा
वरील बाबी स्विकारल्यास मूल हे शिकतच

विक्रम अड़सुळ
9923715464

संयोजक

Active Teacher's Maharshtra (ATM)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मूल कसं शिकतं भाग-1

मूल कसं शिकतं.

मूल कसं शिकतं याचा विचार करताना सर्वात प्रथम भारता मधे कोणत्या शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो हे पाहिले असता आपल्या असे लक्षात येते की प्रामुख्याने दोन शिक्षण पद्धती आपणाला दिसून येतात.
🔷वर्तनवादी शिक्षण पद्धती
🔷रचनावादी शिक्षण पद्धती

वर्तनवादी शिक्षण पद्धतीचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की या पद्धती मधे सर्व शिक्षण तज्ञानी प्राण्यांवर प्रयोग केलेले आपल्या लक्ष्यात येते तर
रचनावादी शिक्षण पद्धतीत मूल हे केंद्रस्थानी मानुन त्याच्या कड़े असणाऱ्या पूर्व ज्ञानाच्या आधारे ते बालक शिकत असतं.

महाराष्ट्रामधे रचनावाद व रचनावादी शिक्षण पद्धती यावर बऱ्याच तज्ञांनी आप आपल्या परीने अभ्यास करुण मूल कसं शिकते हे सांगण्याचा प्रयन्त केला आहे.

आज मितिला सम्पूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत ज्ञानरचना वाद रुजत चालला आहे .
इयत्ता 1 ली ते 5 वी चा अभ्यासक्रम व् पाठ्यक्रम ही रचनावादी बनवला आहे आणि आता इयत्ता 6 वीचा ही रचनावादी पद्धतीने बनविणे चालु आहे.
तसेच सम्पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत ज्ञानरचनावाद
हां शब्द  रुजला आहे तसेच त्या पद्धतीने शिक्षक बांधव शिकविण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकाने सुलभकाची भूमिका करत असताना
मूल कसं शिकतं हे ही समजून घेणे  महत्वाचे आहे .

मुलं कसं शिकतं.....
🔷लहान वयापासुन मुले कृतीत रमतात.
🔷नवीन शिकण्याचा आनंद मुले लगेच व्यक्त करतात.
🔷साधनांच्या सहाय्याने मुले एकाग्र होतात.
🔷कृती करुन शिकताना संकल्पना स्पष्ट  होतात.
🔷स्वयंअध्ययनाने मुले आपली ज्ञानरचना आपणच करतात.
🔷मुले एकमेकांच्या सहाय्याने चांगली शिकतात.
🔷ज्ञान मिळविणे म्हणजे मूर्त अमूर्त विश्वाची ओळख होय.
🔷रचनावाद पद्धतीत मुले आव्हाने घेवून शिकतात.
🔷शिक्षक व् मुले एकत्र शिकतात.
🔷गटात शिकणे ही प्रभावी शिक्षण पद्धती आहे.
🔷स्वतः हुन शोध घेणे ही रचनावादाची मुलभुत क्रिया आहे.
🔷प्रत्येक मूल स्वतंत्रपणे शिकत असत्.
🔷मुले इतरांचा भावनिक आधार होवू शकतात नव्हे  होतात.
🔷मुक्त संभाषणातून भावनिक प्रतिक्रियाला संधी मिळते.
🔷कलेतून बालकाचा विकास साधता येतो.
🔷एकाग्रता ही आवडत्या कामातून जन्माला येते.


या वरील गोष्टींचा सर्व साधारण पणे
बारकाइने अभ्यास केल्यास मूल कसं शिकतं हे जाणून घेण्यास मदत होईल
कारण सध्या काळानुरूप बदलले पाहीजे.

प्रत्येक शिक्षक आप आपल्या परीने शिकविण्याचे व् सुलभक म्हणून काम करत असतो फक्त जराशी वरील मुद्यांचा विचार केल्यास मूल समजून घेण्यास प्रत्येकाला मदत होईल.

चला तर मग रचनावादी पद्धतीने अध्यापन करून
शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र
प्रगत करुया.

विक्रम अडसुळ

संयोजक

Active Teacher Maharashtra (ATM)

Monday, October 26, 2015

बारामती येथे प्रगत् शै महाराष्ट्र व् तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न

🌍 बारामती येथे राज्यातील 'पहिली प्रात्यक्षिक तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा' मोठया उत्साहात संपन्न..🌎 आज दिनांक २५/१०/२०१५ रोजी बारामती येथे तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा आयोजनात पंचायत समिती बारामतीचे गटशिक्षणाधिकारी श्री. नवनाथ वनवे साहेब तसेच श्री. रामदास काटे सर व सौ. काटे मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे. कार्यशाळेविषयी थोडक्यात माहिती..... ♦शिक्षकांना विद्यार्थ्यासाठी 'टेकसेव्ही' बनवण्यासाठी आणि 'ज्ञानरचनावादात तंत्रज्ञानाचा वापर' या गोष्टीवर विशेष भर सदर कार्यशाळेत देण्यात आला. ♦सदर कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.सुरेश भारती सर, श्री. विक्रम अडसुळ सर, श्री.लक्ष्मण नरसाळे सर, श्री.गोरक्ष पावडे सर हे उपस्थित होते. ♦सदर कार्यशाळेसाठी १०५ शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्व लॅपटॉप सह... अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच प्रात्यक्षिकासह झालेली कार्यशाळा... ♦प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावर पीपीटी दाखवून श्री. विक्रम अडसूळ सर यांनी शंका, समाधान ,आणि मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे मूल समजून घेताना आणि दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर कितपत असावा या विषयी सखोल मार्गदर्शन त्यानी यावेळी केले. ♦ श्री. सुरेश भारती सर यानी ब्लॉग कसा बनवावा? वीडियो निर्मिती कशी करावी? ड्राइव चा वापर कसा करावा? ड्राइव मध्ये फ़ाइल अपलोड कशी करावी? फाइल शेयर कशी करावी? जीमेल मधील बारकावे? cc, bcc, compose याबाबत मार्गदर्शन केले. ♦यूटयूब चा प्रभावी कसा वापर करावा? यूटयूब वर वीडियो कसे अपलोड करावे? वीडियो कसा डाउनलोड कसा करावा? याबाबत श्री. गोरक्ष पावडे सर यानी मार्गदर्शन केले. ♦ Elearning काय आहे? elearning सुरु करण्यासाठी आवश्यक साहित्य काय आवश्यक आहे? elearning कशासाठी यावर श्री. लक्ष्मण नरसाळे सर यानी मार्गदर्शन केले. ♦MAGIC फोल्डर यात अप्रगत मूल मुक्त शाळा, दप्तरमुक्त शाळा, तसेच मूल घडविताना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. ♦ शिक्षकांना सर्व गोष्टी प्रात्यक्षिकासह शिकता आल्यामुळे त्याना नविन शिकता आले याचा आनंद चेहऱ्या वरुण ओसंडून वाहताना दिसून आला. ♦ शिक्षकांच्या तंत्रज्ञान विषयक शंका यावेळी सोडवण्यात आल्या. त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. ♦सदर कार्यशाळेला राज्याचे शिक्षण सचीव श्री.नंदकुमार साहेब यानी शिक्षकांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले त्यामुळे शिक्षक प्रेरित झाल्याचे दिसून आले. ♦अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली.... धन्यवाद..! 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 शब्दांकन उमेश कोटलवार 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Friday, October 23, 2015

मूल समजून घेताना-सोमनाथ वाळके

नमस्कार🙏💐💐 आज दिनांक 18 ऑक्टोबेर रोजी कर्जत जि अहमदनगर येथे इंडियन बहुजन टीचर्स शाखा कर्जत यांच्या वतीने "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व् तंत्रस्नेही कार्यशाळा "आयोजित केलि होती या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सोमनाथ वाळके(तंत्रस्नेही शिक्षक मार्गदर्शक) व् श्री रामदास काटे (म रा अभ्यासक्रम निर्मिति मंडळ सदस्य)हे होते 🔷सोमनाथ वाळके🔷 🔶eLearning म्हणजे काय ?त्याचा वापर प्रत्येक्ष अध्ययन अध्यापनात वापर कसा करावा ,किती प्रमाणात करावा याविषयी सविस्तर माहिती दिली 🔶वर्गामधे प्रत्येक्ष अध्यापन करताना कोणत्या साहित्याचा वापर करावा कोणते साहित्य तयार करावे याविषयी मार्गदर्शन केले 🔶अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा ह्या संगणक असलेल्या शाळा आहेत त्यामुळे सर्व शिक्षकानी त्याचा पुरेपूर वापर करावा 🔶मूल समजून घेताना या विषयावर बोलताना त्यांनी सोप्या सोप्या पण फार महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला 🔶मूल समजून घेत असताना आपल्या PPT च्या सहाय्याने घर ,शाळा,समाज,सहकारी या सर्व गोष्टिनचा मुलावर होणारा परिणाम व् फायदे समर्पक शब्दात सांगितले 🔶आपली शाळा पेपरलेस कशी बनवावी ,शैक्षणिक ऍप याविषयी माहिती दिली 🔶या कार्यशाळेत त्यांनी विविध दाखले देत शिक्षक कसा असावा या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले 🔶रामदास काटे यांनी शिक्षणातील तंत्र ज्ञानाचे महत्व समजावून सांगून त्याचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले 🔶त्याच बरोबर विविध नवोपक्रम याविषयी मार्गदर्शन केले 🔶कार्यक्रमाच्या शेवटी मा शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांनी उपस्थित शिक्षकांशी फोन वरुण संवाद साधला 🔶मा सचिव साहेबांच्या संवदामुळे उपस्थित लोक भारवून गेले 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कार्यशाळेनंतर इब्टाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली या मधे अविनाश घोड़के यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली 🌴🌴🌴🌴🌴 संकलन विक्रम अडसुळ

गणित प्रश्नपत्रिका आराखडा कार्यशाळा -ज्योती बलव

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) नमस्कार 👏 दि.८ व ९ आँक्टोंबर रोजी SCERT पुणे येथे संकलित १ चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका विकसन आराखडा ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेस मला निमंत्रित केले होते त्याचा अनुभव व महत्वाचे मुद्दे 👇👇👇👇👇👇👇👇 प्रथम सप्टेंबर मध्ये झालेल्या पायाभूत चाचणीचे अनुभव आणि अडचणी व त्रुटी यांवर चर्चा करुन ..पुढील संकलित १ चाचणीत त्या त्रुटी पुन्हा न होण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले. पायाभूत चाचणी नोव्हेंबर मध्ये झाल्याने अध्यापनासाठी पुरेसा कालावधी मिळण्यासाठी संकलित १ चाचणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे ठरले. फ़क्त (भाषा आणि गणित) उरलेल्या चार विषयांची संकलित चाचणी १ नेहमीप्रमाणे दिवाळीच्या सुट्टी पुर्वी घेण्याचे ठरले. भाषा व गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका SCERT कडून मिळतील. संकलित १ च्या प्रश्नपत्रिकेत A आणि B असे दोन विभाग असतील. त्यापैकी A विभागात पायाभूतवर आधारित प्रश्न असतील तर B विभागात इ.१ली ते ८ वी च्या अनुषंगाने त्या इयत्तेतील प्रथम सत्रावरील घटकावर आधारित प्रश्न असतील. संकलित १ चाचणीसाठी पायाभूतवर आधारित ४०% तर इयत्तेच्या प्रथम सत्रातील घटकावर ६०% प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिकेत प्रथम सत्रातील सर्व घटकांचा सामावेश करावा. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे क्षेत्र ,घटक,उपघटक, प्रश्नातील तपासायचा मुद्दा, गुण इ.बाबी नमुद करावेत. प्रश्नपत्रिका तयार करताना सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा ..शहरी , ग्रामीण इ.बाबींचा विचार करुन काढावी. प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न आव्हानात्मक असतील. कार्यशाळेच्या पुढील बैठकीत या आराखड्यात नमुना प्रश्नपत्रिका तयार करुन त्यावर चर्चा करुन अंतिम प्रश्नपत्रिका कशी असावी हे ठरविण्यात येईल. नंतर याच प्रश्नपत्रिका इतर भाषेत अनुवादित करण्याचे ठरले. ज्योती दिपक बेलवले . जि.प.शाळा केवणीदिवे . ता.भिवंडी ..जि.ठाणे. कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)

जुन्या बांगड्या पासून कलाकृति

जुन्या बांगड्यांपासुन व वर्तमानपत्रांपासुन तयार केलेल्या टोपल्या. जुन्या बांगड्या सेलोटेपने फोटोत दाखवल्याप्रमाणे चिटकवल्या. प्रेजेंट पेपर किंवा कोणताही टाकाऊ आकर्षक पेपर लावून टोपली तयार केली. या टोपलीचा उपयोग फुले ठेवण्यासाठी होऊ शकतो.ह्या टोपलीत जास्त वजनाच्या वस्तू ठेवू नयेत. जुन्या वर्तमानपत्र पत्राच्या कागदाची घडी घालून त्या एकमेकांवर रचून ..घड्यांचे छोटे रोल करुन ते एकमेकांवर चिटकवून ..अशा विविध आकाराच्या टोपल्या तयार करुन त्या रंगवल्या. या टोपल्या लहान ,मोठ्या कशाही बनवता येतात. या मजबूत असल्याने यात फळे,भाज्या इ. वजनाने भारी वस्तू देखील ठेवू शकतो.

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल