Saturday, April 21, 2018
अहमदनगर (कोकमठाण)कार्यप्रेरणा परिषद
🏆 *नगरची कार्यप्रेरणा परिषद* 🏆
🌋 *आधी केले..मग सांगितले*!🌋
🎯.. *चाललो आम्ही प्रगत च्या दिशेने*!
🏇🏇🏇🏇🏇
दि. २६ सप्टे. २०१६ सोमवार कोपरगावातील कोकमठाण येथून !
मोठया आनंदाच्या अन उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या कार्यप्रेरणा परिषदेचा *अनुभलेला वृत्तांत* जसा आठवला तसा !
*संधी साधू* च्या जमान्यात चांगल्या माणसानं पुढं आलं पाहिजे... आपलं काम इतरांनां दाखवलं पाहिजे .. *जग बदलतंय आपणंही थोडं बदललं पाहिजे* .. असं सांगून चांगलं काम करणाऱ्या माणसांना नेहमी चांगल्या *संधी* मिळतात अन मिळालेल्या संधीचं नेहमी सोनं करावं असा *परीस- मंत्र* सांगणारे नगर जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्रा.) मा. श्री. अशोक कडूस साहेब यांनी कोपरगाव शिक्षण विभागावर जिल्हास्तर परिषद घेण्याचा *विश्वास* दाखवला अन तुम्ही छान करु शकता असा *आत्मविश्वास* देवून तयारीला लागा अशा सुचना केल्या.इतकंच सांगून साहेब थांबले नाही तर त्यासाठी मदत , मार्गदर्शन करण्यासाठी राहुरीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम.पटारे मॅडम व अनुभवी विस्तार अधिकारी वाकचौरे साहेब यांनाही आवश्यक सुचना केल्या.
त्यानुसार राहूरीच्या ग.शि.अ.मा. श्रीम.पटारे मॅडम, आम्हा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे बापू आदरणीय डी.डी. वाघचौरे साहेब, व कोपरगावच्या प्र. ग. शि. अ. शबाना शेख या त्रिमुर्तींच्या कल्पकतेतून , मार्गदर्शनातून आणि नियोजनातून कोकमठाणच्या आत्मा मालिकच्या महादेवी हॉल मध्ये २६ सप्टे. २०१६ ची कार्यप्रेरणा परिषद संपन्न झाली.
ज्यांच्यासाठी आपण हे सर्व काही करतो आहोत त्या विदयार्थ्यांच्या सादरीकरणापासून परिषदेची सुरवात करण्याचा उद्देश फक्त आणि फक्त *जाणिवेची जाणिव* निर्माण करणं हाच होता.
साध्या.. सोप्या.. सरळ शब्दातील प्रास्ताविकातून मा. कडूस साहेबांनी कार्यप्रेरकांसमोर अहमदनगरची पी.एस.एम.बाबत पार्श्वभूमी मांडली जी कार्यप्रेरकांच्या टीमला देखील परिषद यशस्वी करण्यासाठी पूरक ठरली.. तसंच साहेबांना दाखवण्यासाठी नव्हे तर आत्मीक समाधानासाठी काम करा असं आवाहनही या वेळी कडूस साहेबांनी उपस्थितांना केलं.
आजच्या परिषदेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आदर्शवादापेक्षा *वास्तववाद* आणि *कार्यवाद* यावर भर.. काय करणार? .. काय असावं?.. कसं असावं? यापेक्षा *काय केलं अन कसं केलं*.. ते करताना *अडचणी* काय आल्या अन त्या *कशा सोडवल्या* यावरच फक्त फोकस !
एक प्रकारे बाप दाखव नाही तर श्राध्द घाल... असंच काही बोललं तर ते वावगं ठरू नये... जे केलंय तेच दाखवता येतं ! नुसतं फेकायचं अन समोरच्यानं गुंडाळायचं असा काळ नाही राहिला आता ! आज परिषदेत प्रत्येक नाणं ( सादरकर्ता ) खणखणीत होतं.
*जिवंत माणुसंच जिवंत माणसांच्या अंगावर शहारा आणू शकतो* .. रोमांच निर्माण करू शकतो हे *भावनिकतेचा मास्टर माईंड* कार्यप्रेरक दादासाहेब नवपुते या गुरुजींना ऐकताना आम्ही अनुभवत होतो.
दादांनी एक साधा *चेंडू* आणि तीन - साडेतीन *फुट दोरी*च्या मदतीनं गंजत चाललेल्या मानसिकतेला दुरुस्त करण्यासाठी.. डोक्याला *झिणझिण्या आणणारं वास्तव* उभं केलं ... नुसतं *वास्तव* मांडलं नाही तर त्याला *तोडगा* सुद्धा सांगितला.
दादांनी मुल समजून घेताना मी बदललं पाहिजे.. मी बदललो तर जग बदलेल हे पोटतिडकीने सांगताना *आजारी विदयार्थ्याच्या घरी सदिच्छा* भेट उपक्रमात *पाच रुपयाचा बिस्कीट पुडा* सुध्दा क्रांती घडवून आणू शकतो हे दाखवून दिलं.. मुलांसमवेत जेवा.. मुलांच्या आवडी निवडी जपा.. *वाटाण्याची बेरीज* अन *वजाबाकीतून हरबरे* असे साधे साधे उपक्रम सुचवून सर्वांना रोमांचित अन प्रेरित सुध्दा केलं.
*श्री.प्रकाश कांबळे* .. दुसरे कार्यप्रेरक.. वय वर्षे ५४.. चार वेळेस ओपन हार्ट सर्जरी.. दुर्गम भागात नोकरी.. कुठं वर्धा .. कुठं औरंगाबाद ..बीड.. अन आज कोपरगाव.. प्रचंड प्रवास.. *प्रचंड ऊर्जा.. अन उत्साह*.. ! डिस्कवरी चॅनेलने नोंद✍ घेतली या माणसाची मी काय लिहीणार या माणसाबद्दल ! स्वतःच्या खिशातून तीन लाख रुपये शाळेला खर्च करणाऱ्या या माणसाच्या कार्याला सलाम💐🙏 !
तिसरं व्यक्तिमत्व *श्री. रमेश ठाकूर* ! अगोदर शिक्षकांचा मित्र अन नंतर विस्तार अधिकारी ! *खुर्चीवरुन फरचीवर* बसणारा.. जीव तोडून काम करू नका तर *जीव जोडून काम करा* असं सांगणारा.. *दीड* घंटयांचा संदेश *दीड* मिनटाच्या बदकाच्या पिलांची क्लिप मधून सांगणारा .. अधिकारी.. सर्वांनाच भावलेला माणुस ! पी.एस.एम. चा साधा सोपा अर्थ ज्या सरळ पध्दतीनं त्यांनी मांडला तो काळजाला भिडणारा होता. *मुले* ऐवजी *मुल*. हा *मुल मंत्र* सांगताना मला काय करायचं? का करायचं ?अन आहे त्या परिस्थितीत उत्कृष्ट कसं करु ही *त्रिसुत्रीही* मांडली.
अधिकारी - शिक्षक यांच्यातील *भीती*.. तिचा परिणाम शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील भितीवर.. तिचा परिणाम विदयार्थी अन अभ्यास यांच्यातील भितीवर .. या अनिस्ट भिती चक्रातील दोन घटका दरम्यानची *भितीची भिंत* जर पाडली तर आपोआप *गुणवत्तेचं मंदिर* निर्माण होईल हेच ठाकूर सरांच्या व्यक्तिमत्वातून दिसलं! ठाकूर आडनावाची माणसंच ग्रेट👌 !
आजच्या परिषदेच्या कार्यप्रेरकांच्या लिडर नेवासाच्या गटशिक्षण अधिकारी *श्रीम.साईलता सामलेटी* लिडर या पदाला खरोखरच शोभत होत्या.. अन त्याप्रमाणं न्यायही देत होत्या.. नम्रता हा त्यांचा दागिना वाटला.. असंख्य पुस्तकात वाचलेलं यशाचं *श्रेय इतरांना दया .. अन मोठे व्हा* ! हा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कृतीतून ..बोलण्यातून दिसत होता.. ! त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय हे त्यांच्या पूर्ण टिमला दिलं.. टिमकडूनही खूप शिकायला मिळालं असं सांगून यशाचं हे रहस्य सांगताना कॉपी करु नका, ईतरांना मदत ही स्वतःला मदत , *चोरी मधाची होईल पण गुणवत्तेची मुळीच नाही* या आशयाच्या प्रेरणादायी बाबी यावेळी शेअर केल्या.
खरं तर आमच्या जिल्हयातून काहीतरी घेवून जाण्यासाठी बाहेरुन (वर्धा, औरंगाबाद ) आलेली ही *प्रेरक मंडळी* आम्हालाच खूप काही देवून गेली !
जिल्हयातील विक्रम अडसूळ यांच्या बंडगर वस्ती शाळेचा *ए.टी.एम.* उपक्रम, केंद्र प्रमुख रामदास मोरे यांचं दुष्काळी भागात *आय.एस.ओ*., *ध्येयवेडे* ज्ञानेश्वर इंगळे सरांची स्वप्नातील शाळा, *शिक्षकांप्रती तळमळ* असलेले केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत देशमुख यांचं शिक्षकांनी वाचलं पाहिजे, *अॅक्टीव* विस्तार अधिकारी (शि) श्री. संभाजी झावरे यांनी बिटाची प्रगती -सांख्यिकी आधार , तर कोपरगावच्या गटशिक्षण अधिकारी श्रीम.शबाना शेख यांनी पी.एस.एम. साठी राबवलेले उपक्रम,केलेले नियोजन, अंमलबजावणी इ. बाबींवर प्रकाश टाकून प्रेरणा निर्माण केली.
खरं तर आजच्या परिषदेचं इतिवृत्त लिहिण्यासाठी श्री. खैरे, श्री. खरात व श्री. गोसावी यांना सांगितले पण ते परिषदेतील वातावरणात इतके *इनव्हॉल्व* झाले होते की त्यामुळे ते लिहू शकले नाही. *देहभान हरपून जाणे* म्हणजे तरी दुसरे काय..?ते ही या निमित्ताने पहायला मिळाले.तीच *यशस्वीतेची पावती* !
बोलण्यासाठी संधी मिळाली की त्याचंही सोनं करणारी माणसं असतात पण *संधी* नावाखाली *हौस* नावाचं पिक येवू नये म्हणून नियोजनात घंटी (बेल)🔔 नावाचं *प्रतिजैवक* वापरलं गेलं म्हणून घंटींला 🔔आवर्जुन धन्यवाद 🙏लिहावेच लागतील ! सांगण्याचं तात्पर्य *सुक्ष्म नियोजनाचा* तो एक भाग ! यशस्वीतेचं श्रेयाचा आणखी एक मानकरी .. सर्वाना सर्व काही मनापासून सांगणारा .. दाखवणारा एल.ई.डी. ! शेवटचा *कोपरा* देखील ठेवला त्यानं *हसरा*.
सक्रीय, उपक्रमशील शिक्षक *भाऊसाहेब चासकर, संदीप वाकचौरे सर* यांच्यासारखे सभेला दोन -दोन तास खिळवून ठेवणारे गुरुजी तसेच शिक्षण क्षेत्राचा व्यासंग अन प्रशासनाचा प्रदिर्घ अनुभव असणारे मा.गट शिक्षण अधिकारी श्री. *हराळ साहेब*, श्री. *पावसेसाहेब*... शेवगावचे श्री. बुगे साहेब.. रहाता बी.ई.ओ. शिवगुंडे मॅडम , संगमनेरचे आर.एम. गायकवाड, पाथर्डीचे कराड बंधू ..यांनीही आजच्या परिषदेतील सर्व सादर कर्त्यांना *मनापासून दाद* दिली व त्यांचे *अभिनंदन* करुन *कौतूकही* केले.. *नवनविन हिरे शोधणे.. अन त्यांना पैलू पाडणे* .. ज्ञानाचा कौशल्याचा वारसा *संवर्धन व संक्रमण* असाच उद्देश यापुढील काळात परिषदांचा राहील असे वाटते.
परिषदेत आत्मा मालिक कुलातील प्राचार्य डांगे सरांनी आपल्या मधुर वाणीनं कुलातील मराठी माध्यमाची स्पर्धा .. गौरवपुर्ण इतिहास व वर्तमान चा आलेख मांडून आम्ही उपक्रम सांगून आमचं *सिक्रेट* सांगत नाही तर *रिझल्ट देतो* असं सांगून यशाचं रहस्य खुलं करुन गेले अन *प्रेरणाही* देऊन गेले.
सकाळचा ९ चा नाष्टा.. दोन वेळचा चहा .. दुपारचं दीडचं जेवणं.. डायटच्या श्रीम.निशीगंधा चौधरी यांनी कार्यप्रेरक व सादरीकरण केलेल्या व्यक्तींचा पुस्तक देवून ते करत असलेल्या कामाचा गौरव व मार्गदर्शन .. तसंच प्रत्येकानं विचारपिठावरुन उत्तम काम करणाऱ्या व *धडपडणाऱ्या व्यक्तिंचा नामोल्लेख करुन केलेला सन्मान*.. प्रातिनिधिक स्वरुपात आदर्श गुरुजी संदीप वाकचौरे यांचा सत्कार आदी घटना सुध्दा प्रेरक होत्या.
परिषदेस जिल्हातील सर्व तालूक्यातून गट शिक्षणाधिकारी, मुख्यालयाचे व तालूक्याचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख , शिक्षक, सर्व बी.आर.सी. चे विषय तज्ञ ,मोठया संख्येने व पुर्णवेळ उपस्थित होते. सदैव काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लोकप्रतिनिधी ..पं.स. कोपरगावचे सभापती मा.श्री. सुनिलराव देवकर यांची उपस्थिती आम्हाला आमच्या कामाची पावती देऊन गेली.
५.३० वाजेपर्यंत चाललेल्या परिषदेत गीतगायन जि.प. सोनेवाडी च्या विदयार्थ्यांनी केले..व माने सरांच्या गीत मंचाने मनं जिंकली.. उत्कृष्ट सुत्रसंचलन करणारे श्री. कहांडळसर , त्यांना सहकार्य करणारे फैय्याज पठाण सर.. तसेच उपस्थितांचे ऋण व्यक्त करताना श्री.डी.डी. वाकचौरे साहेबांनी दिवसभर उभे राहून तत्पर सेवा देणाऱ्या कर्मचारी, तंत्र स्नेही शिक्षक व पडदयामागील सर्वांचा उल्लेख करुन *गौरव* केला व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
राज्यात सुरु असलेल्या प्रेरणा परिषदेसाठी *नगर जिल्हयाला* मिळालेल्या *कार्यप्रेरक टीमची* वरिष्ठ व एस.सी.ई.आर.टी. यांनी विशेष नोंद घ्यावी ही *विनंती*. ! या टिम बरोबर जो चव्हाण आडनावाचे ड्रायव्हर... एका रात्रीच्या मुक्कामाच्या निमित्ताने एका चांगल्या मित्राची.. माणसातल्या *एका चांगल्या माणसाची* ओळख झाली. हा *माणुस निवडताना* एस.सी.ई.आर.टी. ने घेतलेली दक्षता ही सुध्दा एक प्रेरक आणि वैशिष्ट्यपुर्ण बाब ! नेहमीच *नंबर वन* राहणाऱ्या नगरकरांना नंबर वन साठी शुभेच्छा !💐💐💐
चांगला शर्ट शिवताना नक्कीच चिंध्या सुध्दा पडतात तसं हे सगळं करताना काही उणिवां देखिल नक्कीच राहिल्या असतील कार्यक्रमात अन लिहिताना सुध्दा यात शंका नाही. त्या बद्दल क्षमस्व व दिलगिरी🙏 ..पण नेक्स टाईम त्या चिंध्यांचं *उशी* नाही तर किमान *डस्टर* शिवण्यासाठी तरी त्याचा नक्कीच उपयोग होईल या आशावादासह सर्वाना पुनश्च शुभेच्छा.💐💐💐
✍✍✍
*शंकर आ. गाडेकर*
विस्तार अधिकारी (शिक्षण)
पंचायत समिती , कोपरगाव
*प्रेरणा व मार्गदर्शन*
श्रीम.शबाना शेख
प्र.गट शिक्षण अधिकारी
पंचायत समिती, कोपरगाव
📕📓📗📘📙📔📒🖍

Thursday, October 5, 2017
*स्पेशल डे.. स्पेशल डिश..*
*चिकन बिर्याणी*
🥘🥘🥘🥘🥘🥘🥘
बऱ्याच दिवसापासूनची मुलांची इच्छा आज पूर्ण झाली.
आज जि.प.प्राथ.शाळा बंडगरवस्ती येथे दुपारच्या शालेय पोषण आहारामध्ये *चिकन बिर्याणीचा* बेत केला होता.
सकाळीच शाळेत येताना तालुक्याच्या ठिकाणाहून चिकन व इतर साहित्य घेतले.कविता मॅडम यांना कल्पना दिली .मी शाळेत जाईपर्यंत कविता मॅडम आणि बालचमूने बिर्याणीची पूर्वतयारी करून ठेवली होती.या कामी बिर्याणी पाककलेत माहीर असलेल्या हंडाळवाडी येथील अंगणवाडी ताई निलोफर शेख मॅडम मदतीला धावून आल्या अन मग काय बिर्याणीची प्रत्येक्ष कृती सुरू झाली.
शालेय परिसरात सर्वत्र फोडणीचा घमघमाट..
छान बेत झाला
*पुढील डिश लवकरच..*

Saturday, October 8, 2016
फडक्यातली भाकरी...
*फडक्यातील भाकरी*
🍪🍪🍪🍪🍪🍪
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
काल दुपारची जेवणाची सुट्टी.
आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मुले व मी एकत्र शाळेच्या व्हरांड्यात जेवणासाठी बसलो होतो.सर्वांनी आपापला डबा उघडून जेवायला सुरुवात केली सोबत पोषण आहार ही होता
चौथीच्या वर्गातील प्रतिक्षाने डब्यात बाजरीची भाकरी आणलेली पण ती जेवणा डब्याशी कसलीतरी झटापट चालू होती तिची ..
मी न राहवून विचारले काय झाले मग तिच्या शेजारी बसलेल्या दीपाली ने सांगितले
*सर ...*
*तिच्या डब्यातून भाकरी निगत नाय..*
मग मी म्हणालो बघू मी काढून देतो ..मलाही डब्यातील भाकरी निघेना...😔😔
कारण ही तसेच होते
भाकरी डब्यात इतकी फिट्ट बसली होती की हाताने निघेना
मग आम्ही शाळेतील भातवडीचा वापर करून डब्यातील भाकरी काढली..
मला ही बाजरीची भाकरी पाहून खाण्याचा मोह आवरला नाही. कारण ही तसेच..
सध्या खरिपाची पिके निघाली आहेत नवीन बाजरी झाली आहे ..अन मीठ टाकून बनवलेली बाजरीची खाण्यात मजा काही औरच असते.
मग आमच्या बाजरीच्या भाकरीवर खूप गप्पा झाल्या.
भाकरी कशी बनवली पाहिजे,भाकरीसोबत काय छान लागते...असे बरेच काही..
मी काल बोलता बोलता बोलून गेलो होतो की डब्यात भाकरी कडक राहत नाही ती चिकटते या साठी फडक्यात बांधून आणलेली भाकरी कडक राहते व चवीला हि छान लागते..
*मी लहान असताना माझी आई मला फडक्यात भाकरी बांधून द्यायची असं खूप काही बोललो*
*लहानपणीच्या माझ्या बालआठवणी जेवण करताना मुलांना सांगितल्या*
*अन आज.....*
दुपारी जेवणाची सुट्टी झाली मी प्रश्नार्थी शब्द हे शैक्षणिक साहित्य बनवत होतो काम चालूच होते.मुलांना जेवायला बसा सांगितले मी येतोच असं म्हणून.पण कामामुळे 5 मिनिट झाले तरी लक्षात नाही आले की जेवायचे
दीपाली दरवाज्यापाशी घुटमळत होती म्हणून मी तिला थोडं मोठ्या आवाजतच बोललो ..
जा बस कि जेवायला ...
पण ती जाईना..
मग मी विचारले का जेवणास तेव्हा तिने जे उत्तर दिले त्या उत्तराने माझ्या हातातील काम आपोआप बंद पडले आणि मी खुर्चीवरून ताडकन उठलो....
माहितेय तिने काय सांगितले
*स चला ना जेवायला*
*मी फडक्यात बाजरीची अन मिरचीची ठेचा आणलाय..*
खरच क्षणभर विचारात पडलो
लेकरं किती जीव लावतात आपल्याला,
किती प्रेम करतात,
किती आत्मीयता असते मुलांची आपल्याशी,
क्षणभर तृप्तीताई समोर उभ्या राहिल्या अन त्यांचा शब्द आठवला ....
*सर्वात प्रथम प्रत्येक शिक्षकाने मूल समजून घेतले पाहिजे*
खरंच मूले फार जीव लावतात आपल्याला..
*आजचे जेवण खरच इतके चविष्ट होते की पंचपक्वांन ही या माझ्या दीपालीने आणलेल्या फडक्यातील भाकरीपुढे फिके ठरले असते*
आजचा दिवस खूप काही शिकवून गेला
🙏🙏🙏🙏🙏

कर्जत तालुकास्तरीय शिक्षण परिषद
*शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र स्तरावर शिक्षण परिषद घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज *दि.17 सप्टेंबर 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा. अशोक कडूस साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील केंद्र स्तरावरील शिक्षण परिषद पार पडल्या.*
*याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील सर्व केंद्रातील शिक्षण परिषद मा. गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.*
या परिषदेमध्ये केंद्रातील ज्या शिक्षकांचे प्रगत वर्ग आहेत,प्रगत शाळा आहेत ,तसेच ज्या शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे अश्या शिक्षकांनी आपल्या शाळेचे सादरीकरण व्हिडीओ,पीपीटी यांच्या साहाय्याने केले.यावेळी सम्पूर्ण वातावरण सकारात्मक झालेलं दिसून आले.
*राशिन केंद्राच्या परिषदेमध्ये आदरणीय शिक्षण आयुक्त मा. धीरज कुमार साहेब व मा. शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांनी मोबाईल फोन वरून शिक्षकांशी संवाद साधला व एकंदरीत परीषदेचा आढावा घेतला .आदरणीय साहेबांच्या या फोन संदेशा मुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून येत होते.*
*यानंतर कोरेगाव केंद्रातील शिक्षण परिषदेमध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी असणारा ..स्फूर्तीचा अखंड झरा..आधुनिक सावित्रीमाई लातूरच्या गटशिक्षणाधिकारी आदरणीय मा.तृप्ती अंधारे यांनी फोन द्वावारे शिक्षकांशी संवाद साधला.*एकंदरीतच आज संपूर्ण कर्जत तालुका शिक्षणमय झालेला दिसून आला.
प्रत्येक शिक्षक आपण करत असलेले काम इतरांना समजून सांगत होता,आपल्या यशाचे गमक सांगत होता,तसेच स्वतः ची शाळा प्रगत करण्यासाठी ,समृद्ध करण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या हे हि सांगत होता.यातून प्रत्येक शिक्षकाला नवीन दिशा मिळत होती.
आज एकंदरीतच प्रत्येक शिक्षक माझ्या शाळेतील प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी काय करता येईल हे एकमेकांना सांगत होता
आजचे आदरणीय मान्यवरांचे फोनवरील मार्गदर्शन,शिक्षकांशी साधलेला संवाद खूपच प्रेरणादायी ,सकारात्मक ऊर्जा देऊन गेला.
आजची ही शिक्षण परिषद पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी,उपक्रमशील शिक्षक व कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. शिंदे साहेब या सर्वांनी परिश्रम घेतले
*मी एक शिक्षक म्हणून मला काही केंद्रामध्ये माझ्या शाळेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली ,माझ्या शाळेचे काम मला सादर करता आले हे मी माझे भाग्य समजतो.*
खरच केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदेचे आयोजन हा शासनाने घेतलेला स्तुत्य उपक्रम... असेच मी तर माझ्या शब्दात वर्णन करेल...
🙏🙏🙏🙏🙏
*विक्रम अडसूळ*
*कर्जत ,अहमदनगर*
*9923715464*
💐💐💐💐💐💐

Tuesday, August 2, 2016
पुणे विभागीय शिक्षण परिषद-बारामती
*बारामती शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*दि 24 व 25 जुलै 2015 या कालावधीतअहमदनगर,सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यातील केंद्रप्रमुख,विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची दोन दिवशीय विभागीय कार्यशाळा पार पडली.वास्तविक पाहता यातील मी कसलाही* *प्रशासकीय अधिकारी नाही तरीही मला या कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब यांनी दिली त्याबद्दल साहेबांचे प्रथमतः आभार व धन्यवाद*
🙏🙏🙏🙏
पहिल्या दिवशी काही शाळा तसेच केंद्र स्तर व गटस्तरावरील सादरीकरण झाले ,प्रथम दिवशी *आदरणीय नामदेवराव जरग साहेब* दिवसभर कार्यशाळेसाठी उपस्थित होते.साहेबानी अगदी समर्पक असे प्रश्न विचारत सभागृह बोलते केले आणि प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी आपण काय केले पाहिजे हे त्यांनी त्यांच्या समर्पक शब्दात सांगितले
त्याचबरोबर *आदरणीय दिनकर टेमकर साहेब* हे ही या परिषदेसाठी दोन दिवस उपस्थित होते,त्यांनी हि सभागृहाला योग्य असे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी त्यांच्या सेवाकाळातील काही उदाहरणे देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आलेल्या प्रसंगांना कसे सामोरे गेले हे त्यांनी सांगितले .आदरणीय साहेबानी दिलेल्या उदाहरनांपैकी नांदेड जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी असताना फोन वर घडलेला किस्सा सांगितला आणि सभागृहात एकच हस्या पिकला
आदरणीय साहेबानी या परिषदेसाठी फार कष्ट घेऊन परिषद यशस्वी केली
जिल्हास्तारावरील सादरीकरणात *आदरणीय अशोक कडूस (शिक्षणाधिकारी अहमदनगर)* *मुस्ताक शेख(शिक्षणाधिकारी* पुणे) ,घाटगे साहेब (शिक्षणाधिकारी सोलापूर) तसेच डायट प्राचार्या मेटे मॅडम व औटें मॅडम यांनी सादरीकरण केले ,यामध्ये प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेतला
आदरणीय कडूस साहेब यांनी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक मूल शिकण्यासाठी काय केले ?
काय करत आहे ? पुढील दिशा समजावून सांगितली
गटस्तरावरील सादरीकरणात
पंढरपूरच्या *गटशिक्षणाधिकारी *सुलभा वठारे मॅडम,नेवासा गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम,* यांनी आपल्या कार्याचा आलेख सांगितलं तसेच पंढरपूर मधील दत्तक शाळा उपक्रम फारच सकारात्मक वाटला
तसेच नेवासा तालुका राजकीय व शिक्षक संघटनात्मक संवेदनशील असूनही एक महिला अधिकारी म्हणून करत असलेल्या कामाची पद्धत सर्वाना एक नवी उमेद देत होती
वाबळेवाडी व पावरवाडी या शाळेनी आपल्या शाळेचे सादरीकरण केले
दुसऱ्या दिवशी केंद्र स्तरावरील सादरीकरण झाले
पूर्णा तालुक्याचे *गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे साहेब* यांनी त्यांच्या खड्या आवाजातील मार्गदर्शनात काम कसे करावे व काम कश्यासाठी करायचे हे समजावून सांगितलं
शेवटी साहेबानी वामनदादा कर्डक यांची कविता गायन करून सभागृहामध्ये नवचैतन्य निर्माण केले
बऱ्याच दिवसाची साहेबांनी गायलेली कविता ऐकायची इच्छा पूर्ण झाली
त्याच बरोबर गेवराईचे विस्तार अधिकारी प्रेरणादायी व्यक्तिमत्व *काळम पाटील साहेब* यांनी त्यांनी लोकसहभाग कसा जमवला हे सांगून व काम कसे केले याविषयी मार्गदर्शन केले
अचानक सभागृहात प्रवेश झाला तो स्फूर्तीचा अखंड झरा असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील आधुनिक सावित्रीचा म्हणजेच..
*लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे* यांचा
तृप्ती ताईंनी अगदी मोजक्या शब्दात आपल्या कार्याची माहिती देऊन सभागृहातील सर्वाना काम करत रहा हे सांगितले
दुपारी एक वाजता आदरणीय
*शिक्षण संचालक नांदेडे साहेब व शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* आले
या मान्यवरांच्या समोर मला सादरीकरण करण्याची संधी मिळाली हे मी माझे
भाग्य समजतो
आदरणीय नांदेडे साहेब यांनी अगदी प्रेरणादायी शब्दात सम्पूर्ण सभागृहाला काम करण्याची प्रेरणा दिली,प्रत्येकाच्या मनामध्ये एक ऊर्जित अवस्था निर्माण केली
आभाळा एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व पण कसलाही मी पणा नाही कि पदाचा गर्व नाही
साहेबांकडून खूप काही शिकता आले,साहेबानी मूल शिकलं पाहिजे याचे आवाहन केले
*शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* यांनी त्यांच्या शैलीमध्ये उपस्थित सभागृहाला विविध उदाहरणाचा दाखल देत मार्गदर्शन केले यातील साहेबांचे रेल्वे ने प्रवास करणाऱ्या मुलगा वडील आणि गाडीतील सहप्रवाश्याचे उदाहरण देऊन लोकांच्या मनामध्ये नवचैत्यन निर्माण केले
*तसेच प्रगत मधील प्र म्हणजे*
*प्रेरणा ,प्रयत्न व प्रगती या* शब्दात वर्णन केले
या परिषदेसाठी आंग्लभाषा औरंगाबाद चे कांबळे साहेब ही दोन दिवस उपस्थित होते
या परिषदेच्या नियोजनासाठी ज्यांनी मेहनत घेतली अश्या हवेलीच्या *गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार मॅडम* यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन
प्रत्येक परिसंवाद सादरीकरणाचे नियोजन अगदी सुंदर असे केले
त्याच बरोबर *संगीता शिंदे मॅडम* यांनी त्यांना छान अशी साथ दिली
तसेच पुण्याचे *उपशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे साहेब* व इंदापुरचे गटशिक्षणाधिकारी गुरव साहेब यांनी
आपल्या अनुभवाच्या आधारे अतिशय कार्यकुशलतेने परिषदेचे आयोजन केले आणि नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी केली. आज पुन्हा त्याच्यातील कुशलनेतृत्व दिसले.
एकंदरीतच ही दोन दिवशीय शिक्षण परिषद फारच सकारात्मक झाली.या दोन दिवसात खूप काही शिकता आले
*ही परिषद माझ्यासाठी खुप प्रेरणादायी ठरली कारण आपण करत असल्या कामाची पावती आज मिळाली*
यापेक्षा वेगळा काय आनंद असू शकतो
🙏🙏🙏🙏🙏
*विक्रम अडसूळ*
*कर्जत अहमदनगर*
*मोबा.9923715464*

शालेयाचा पहिला दिनु..
*शालेयाचा पहिला दिनु....*
💐💐💐💐💐💐💐
आज दिनांक 15 जून शाळेचा पहिला दिवस सर्व जण अपडेट..
इयत्ता पहिलीमध्ये मुलांना प्रवेश दिला ,पहिल्या दिवशी उपस्थिती 100%
बंडगरवस्ती म्हणजे 18 ते 19 घरांची वस्ती...
वस्तीवरून प्रवेश फेरी काढली
नवागतांचे स्वागत इयत्ता चौथीतील मुलींनी औक्षण घालून केले..
नवीन पुस्तके..
नवीन कपडे..
नवे मित्र..
नवे ठिकाण...
सर्व काही नवे नवे..
स्वागत,गणवेश वाटप व पुस्तक वाटप कार्यक्रम झाल्यावर जिलेबी आणि फरसानाची मेजवानी...त्यात पुन्हा शाळेचा पुलाव...मुलांनी मनसोक्त आनंद लुटत जेवणाचा आस्वाद घेतला..
दुपारनंतर मोठ्या वर्गातील मुलांनी नवीन पुस्तके हातात घेतली तर पहिलीच्या मुलांनी घेतली मांडणीवरील खेळणी..
कुणी ट्रक गाडी तर कुणी गोट्या,चेंडू ....
स्वारी खेळता खेळता दमली अन....
नवीनच जीवनाची वाट चालण्यासाठी सज्ज झालेले दोन जवान वर्गातच चटईवर आडवे झाले..
आम्ही ही त्यांना काही ही न बोलता त्यांची झोप होऊ दिली
खरच किती लहान मुले ती ...
वस्तीवरील बुजुर्ग येऊन सांगू लागले गुरुजी साळला सुटी होती तर लय सूनं सुनं वाटत होतं..
आता कस भरल्यासारखं वाटतय बघा....
आम्ही ही सुखावलो कारण आजपासून पुन्हा आपल्या समोरील चिमुकले नवीन काही शिकण्यासाठी , आम्हाला शिकविण्यासाठी तयार झाली आहेत...
आता आपली जबाबदारी वाढली आहे....
हे मात्र नकी...
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
जि प प्राथ शाळा बंडगरवस्ती
ता कर्जत जि अहमदनगर

Monday, August 1, 2016
ATM राज्यस्तरीय शिक्षण सम्मेलन शिर्डी
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) चे राज्यस्तरीय शिक्षण संमेलन संपन्न .
कोकमठाण शिर्डी (दि.१५)-
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे दोन दिवशीय शिक्षण संमेलन दिनांक १४ व १५ मे रोजी कोकमठाण शिर्डी येथील आत्मा मलिक सभागृहात संपन्न झाले .
व्हाॕट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक प्रेरणादायी व स्वसक्षमीकरणासाठी विशाल कार्य व रचनात्मक काम ATM ने उभे केले आहे.महाराष्ट्रातील कानाकोप-यातून शिक्षक,शिक्षिका स्व खर्चाने ,सुट्टीअसूनही संमेलनासाठी आले होते.
संमेलनातील ठळक बाबी:-
दिवस १ला:-
कार्यक्रमाचे उदघाटन सूर्यवंशी साहेब ,व्यवस्थापक आत्मा मलिक ट्रस्ट तथा माजी उपशिक्षणाधिकारी , धुळे ,ह.ना.जगताप व ATM चे आयोजक विक्रम अडसुळ यांचे हस्ते झाले.
प्रास्तविकात विक्रम अडसुळ यांनी शैक्षणिक संमेलन आयोजनाची भूमिका स्पष्ट केली .
१.मा.ह.ना.जगताप (मानसशास्त्रीय अभ्यासक) यांनी ताण तणावाचे व्यवस्थापण या विषयावर मार्गदर्शन केले.
२.सोमनाथ वाळके सरांनी "मूल समजून घेताना" हा विषय खूप सोप्या पद्धतीने मांडला.
३."शिक्षणातील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर " या परिसंवादात सुनिल अलुरकर,रणजितसिंह डिसले,स्वरदा खेडकर,अनिल कांबळे,अनिल सोनुने यांनी
सहभाग घेऊन प्रभावीपणे समजावले.
४."माझी शाळा माझे उपक्रम " या सदरात ज्योति बेलवले,ज्ञानदेव नवसरे,मंगल पवार,दिपाली बाभूळगांवकर,अलका धांडे,पौर्णिमा राणे,जयमाला मुळीक यांनी आपल्या शाळेत राबवित असलेल्या उपक्रमाबाबत निवेदन केले.
५."शाळा प्रगत करताना " या विषयाच्या परिसंवादात स्नेहा मगदुम,कविता बंडगर,किशोर गर्जे,ज्ञानेश्वर इंगळे,मनिषा पांढरे ,महेश घुगरे यांनी स्वानुभव कथन केले.
६.मुंबईचे शिक्षणनिरीक्षक अनिल साबळे साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थामधील शाळा बदलत असल्याचे स्पष्ट केले.
७.प्रथम दिवसाचा समारोप महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक मा.गोविंद नांदेडे साहेबांच्या प्रकट मुलाखतीने झाला .विक्रम अडसुळ व ज्योति बेलवले यांनी सुंदर मुलाखत घेतली .साहेबांनी आपला खडतर जीवनपट मनमोकळेपणे विषद केला.साहेबांचा प्रत्येक शब्द प्रेरणादायी होता.
दिवस २रा :-
१."रचनावाद समजून घेताना " या विषयावर ग्राममंलचे डाॕ .रमेश पानसे यांनी यांनी चिकित्सक बाबी मांडल्या .
२.अवघ्या महाराष्ट्रासाठी ज्ञानपंढरी कुमठे बीटला बनविणा-या प्रतिभाताई भराडे मँडम यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व मेंदूचा अभ्यास सुंदर शब्दांत व्यक्त केला .
३.वंचितांचे शिक्षण व RTE या परिसंवादात संदीप वाघचौरे,मतीन भोसले ,मनिषा जराड,संतोष मुसळे,दत्ता अम्रित यांनी भाग घेतला .
४."इंग्रजी अध्यापनात मातृभाषेचा वापर करावा की नको " या विषयावर म.रा.पा.नि.मंडळ सदस्य नदीम खान,प्रिती खांडेलवार,अरुणा उदावंत,प्रभाकर लोंढे,नारायण मंगलाराम,गजानन उदार,प्रशांत शेवतकर यांनी विचार मांडले.
५."शैक्षणिक गुणवत्तेत शिक्षकांचे स्वसक्षमीकरण " या विषयाच्या परिसंवादात महाराष्ट्राचे गुणवत्ता प्रेरक सोमनाथ वाळके, म.रा.पा.नि.मंडळ सदस्य समाधान शिकेतोड,आदर्श शाळा जरेवाडीचे अजय घोडके,ISO शाळा रजापूर चे संजय खाडे यांनी विचार मांडले.QR कोड पाठ्यपुस्तकांत आणणारे रणजिंतसिंह डीसले यांनी सुत्रसंचलन केले.
शिक्षकांचे मनोगतात भरत काळे यांनी शिक्षकांची अशी संमेलन आवश्यक असल्याचे सांगितले .
६.लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मँडम यांनी भ्रमणध्वनीद्वारे शिक्षकांना शुभेच्छा दिल्या .
७.कृतिशील शिक्षक महाराष्ट्र परिवाराचे संयोजक विक्रम अडसुळ सरांनी ATM ची भूमिका स्पष्ट करुन समारोप केला .
सकाळी ९ पासून रात्री १० पर्यंत एक एक मिनिट वाया न जाऊ देता इथे ज्ञान यज्ञ पार पडला.मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा वेळ बसून श्रवण केले असे बरेच बोलत होते.श्रवण ,मनन,चिंतन,निवेदन अशा बाबीत वेळ कुठे गेला हे कळलेच नाही. औरंगाबादहून राजू कोळी, रमेश परदेशी ,हाशम शहा,सत्यवान हरेल, मोहन राख,मनोहर नागरे ,गिरीश क्षिरसागर , भरत काळे,नारायण मंगलारम,संजय खाडे आम्ही दहा शिलेदार उपस्थित राहिलो .भरभरुन शिकायला मिळाले.शिक्षकांनी शिक्षकांसाठी शिक्षकांचे भरवलेले हे शैक्षणिक संमेलन ऐतिहासिक ठरले आहे.
⚽शब्दांकन⚽
संजय खाडे ,औरंगाबाद .

Sunday, April 3, 2016
शिक्षणाची वारी..
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
🔷 (ATM)🔷
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासनाच्या महत्वकांक्षी कार्यक्रमांतर्गत "शिक्षणाची वारी"या उपक्रमाचे आयोजन बालेवाडी पुणे येथे दि.२७/१/१६ ते दि.३१/१/१६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
विविध विषयांवरील नानाविध स्वरूपाचे 54 स्टॉल्स आपल्याला येथे पाहावयास मिळत आहेत.
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) ग्रुपच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.कविता बंडगर यांचा भाषा, गणित व भूगोल या विषयाचा स्टॉल येथे लावण्यात आला आहे.
---------------------
स्टॉल क्रमांक-29
🔷स्टॉल मध्ये सहभागी:🔷
१)सौ.कविता बंडगर मॅडम
२)सौ.ज्योती बेलवले
३)श्री.विक्रम अडसूळ
४)सौ.मनीषा पांढरे
५)श्री.उमेश कोटलवार
♦स्टॉल ची वैशिष्ट्ये:♦
👉१)मनोरंजक पद्धतीने भाषाध्यपन कसे करता येईल याचे मार्गदर्शन.
👉२)गणित विषयक आवड निर्माण करण्यासाठी कशाप्रकारे खेळ घेऊन विषयात गोडी निर्माण करता येते याचे प्रात्यक्षिक.
👉३)रचनावादी पद्धतीने भाषा, गणित व भूगोल साहित्य कशापध्दतीने करता येईल याचे मार्गदर्शन.
👉४)टाकाऊ वस्तुंपासून सुलभ आणि उपयुक्त शैक्षणिक साहित्य कसे तयार करता येते याची माहिती.
👉५)विविध भाषाविषयक व गणितविषयक उपक्रम कसे राबवता येतात याची माहिती दिली जात आहे.
👉६)वाचन, लेखन, गणन यावर आधारित भरपूर खेळ.
👉७)ABL तसेच रचनावादी पद्धतीने बनविलेले नानाविध प्रकारचे साहित्य.
याशिवाय बरच काही आपल्याला स्टॉल क्र.29 वर पाहायला मिळेल.
एकवेळ अवश्य भेट देऊन जाणून घ्या...
"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रास देण्या योगदान,
धडपडत्या Atm टीमचे कार्य महान"
धन्यवाद..!
✒✒✒शब्दांकन✒✒✒
ज्योती दीपक बेलवले
🔷कृतिशील शिक्षक महाराष्ट्र(ATM)🔷

ज्ञानरचनावाद राबवताना...
ज्ञानरचनावाद राबवताना.....
आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानरचावाद शैक्षणिक क्षेत्रात रुजला आहे परंतु अजुनहीआमचा शिक्षक गोंधळलेला दिसून येतो
सर्वात प्रथम रचनावाद म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे रचनावाद म्हणजे अस काही मोठ्ठ शास्त्र नाही की जे आपणाला वापरता येणारच नाही.रचनावादाची अगदी सोपी व्याख्या करायला गेल्यास असे म्हणता येईल
✒बालकांना फुलण्यासाठी, आत्मविष्कारासाठी अनुकूल,पूरक परिस्थिती निर्माण करून देणं म्हणजेच ज्ञानरचनावाद होय.
किंवा याहून सोपे
✒रचनावाद म्हणजे--कृतिशील स्वयंअध्ययन
यात सर्वात प्रथम स्वयंअध्ययन म्हणजे मुलं आपलं आपण शिकणार,ते त्याच स्वतः शिकणार शिक्षकाने फक्त शिकण्यास मदत करणे
आणि कृतिशील म्हणजे--
आता या कृतीशीलतेमध्ये
1)शारीरिक कृती
2)साधनं वापरून करावयाची कृती
3)वैचारिक पातळीवर जाण्यासाठी करावी लागणारी कृती
यांचा समावेश करता येईल
जर आपणाला या दोन गोष्टी समजल्या तर आपण रचनावाद चांगल्या प्रकारे राबवू शकतो असे मला वाटत
प्रत्येक शिक्षकाने सर्वात प्रथम हे जाणले पाहिजे कि आपण जे शिक्षण देणार आहोत ते आपल्या वर्गातील मुलांच्या भावी काळासाठी असावं
आज आपल्या समोर शिकणारे विद्यार्थी हे उद्या देशाचे नागरिक होणार आहेत त्यामुळे त्यांना योग्य असे व भावी काळासाठी किफायतशीर असेच शिक्षण दिले पाहिजे.
आज शिकणाऱ्या मुलांना त्यांचे पुढील भावी जीवन जगण्यासाठी व त्याच्या भावी काळासाठी फायद्याचं ठरणार शिक्षण आपण दिले पाहीजे
वर्गामध्ये अध्यापन करत असताना
एक सुलभक म्हणून शिक्षकाने मुलांच्या भावी काळाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत
त्याच बरोबर भावी काळातील गरजांचा विचार करणे गरजेचे असते
सध्याच्या वेगाने बदलत्या काळामध्ये टिकायचे असेल तर आज आपण दिलेले ज्ञान हे उद्याच्या पिढीच्या कामाला येणार असावं
आता सर्वात महत्वाच्या आणि मेंन मुद्द्याकडे आपण पाहूया
वर्गामध्ये ज्ञानरचनावाद प्रभावीपणे राबवत असताना शिक्षकाने खालील गोष्टींचा विचार करावा.
🔷काय द्यायचं ?
🔷कसं द्यायचं ?
🔷किती द्यायचं ?
🔷गरजा नुसार त्यांना काय हवंय ?
रचनावाद प्रभावीपणे राबविण्यासाठी पुर्वज्ञान जागृत करुन त्याची सांगड नवीन ज्ञानाशी घडवून कृती केली पाहिजे.
आशयानुरुप कृती मुलांना दिल्यास मुले कृतीत रमतात..चुकतात..पुन्हा प्रयत्न करतात आणि ज्ञान मिळवतात त्यामुळे हे ज्ञान घोकंपट्टीयुक्त नसते.ते ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.रचनावादात मुल स्वतः विचार करतं.कृती करतं..व नवीन ज्ञानाची निर्मीती करते.
उदा...जैवविविधतेसाठी आपण
🐂🐟🐅🐄🐪🐫🐘 वेगवेगळे प्राणी व त्यातील फरक
एकच प्राणी व त्यातील फरक
उदा.मासा...🐋🐳🐬🐡🐟🐠
माशांची एकच जात व त्यातील फरक...यात आकार...रंग..इ.
बाबतची विविधता आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे किंवा प्रत्यक्ष वस्तू दाखवून मुले त्यातील साम्य भेद निरीक्षणाने रचनावादात अभ्यासतात.
तसेच विविध संकल्पना समजण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन,त्यांच्यासमोर आव्हाने निर्माण करून त्यांची उत्तरे त्यांनाच शोधण्यास प्रवृत्त करणे.
परंतु आजकाल फरशीवर आकृत्या काढल्या म्हणजे शाळेत रचनावादी शिक्षण दिलं जातं असा गोड गैरसमज आमच्या शिक्षक आणि अधिकारी यांच्यामध्ये आपणाला दिसून येतो.
परंतु रचनावादी शिक्षणामध्ये मुलाकडे असणाऱ्या ज्ञानाची सांगड घालायची असते ,मुल आपलं आपण शिकत असत
उदा--मुलांना मापन येत असते
मूल शाळेत येण्याअगोदरच विविध वस्तू ,नाणी -नोटा ,अंतर याचे मापन करत असते,गणितातील बेरीज शिकवत असताना त्याला एकक दशक संकल्पना स्पष्ट झाल्या की ते बेरीज अगदी सफाईदार पणे करते.
वर्गात मुलांना संपूर्ण स्वातंत्र दिले तर मुले चुकत चुकत शिकत असतात आणि वारंवार कृती केल्यामुळे मुलाने आत्मसात केलेले ज्ञान चिरकाल टिकणारे असते
भाषा विषयाचा विचार करायला गेल्यास-------
मुलांना कोणतीही एक भाषा परिपूर्ण आली पाहिजे कारण मुलांचं 8 ते 10 वय हे भाषा शिकण्याचा काळ असतो असे मानसशास्त्र म्हणते आणि मुलाची पहिली भाषा म्हणजे मातृभाषा ही विचार करण्याची क्षमता विकसित करीत असते.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे त्याला वेगवेगळ्या विषयावर कल्पना करायला चालना दिली पाहिजे मग तो विषय कोणताही असो.
उदा- दगडांचा पाऊस पडला तर....
आता तुम्ही म्हणाल हा असला कसला विषय ????
पण मुलांना कल्पना करू द्या
कारण मुलांच्या कल्पना ह्या रबरासारख्या असतात. जेवढ्या ताणाव्या तेवढ्या ताणल्या जातात.यामुळे त्याच्या भावविश्वाचा शोध घेता येतो,त्याच्या मनातील कल्पना समजण्यास मदत होते..
आपल्या वर्गामध्ये प्रभावी ज्ञानरचनावाद राबवत असतांना जर आपण मुलांचा विचार करून त्यांना वेगवेगळ्या कृती करू दिल्या पाहिजेत जेणेकरून मुल आपलं आपण शिकेल व व आपले अध्यापन ही रचनावादी होईल.
विक्रम अडसूळ
कर्जत अहमदनगर

ATM प्रथम वर्धापन दिन
आज 24 मार्च
याच दिवशी ATM ह्या रोपट्याचे बीज रोवले गेले सुरवातीला हे रोपटे इतक्या मोठ्या विशाल वृक्षात विस्तारेल हे मनात देखील आले नव्हते.
या एका वर्ष्याच्या प्रवासामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकापर्यंत एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण जाऊ शकू हा विश्वासच बसत नाही
याचे सर्व श्रेय ATM मधील शिक्षक व अधिकारी याना जाते
आतापर्यंत प्रत्येकजण आपले बेस्ट इथे देण्याचा प्रयत्न करत आहे याचा मला अभिमान आहे
खर सांगतो खूप काही लिहायचं आहे पण आज का कुणास ठाऊक हात चालत नाहीत नको त्यावेळी कितीही लिहितो पण आज अस का होतय कळेना
या यशामध्ये तुम्हा सर्वांचा सिहांचा वाटा आहे मी केवळ निमित्त आहे
हे वैभव जे आहे ते सर्व अपणामुळे आहे
मी एकटा काहीच करू शकत नाही
आणि एक गोष्ट मी नक्की शिकलो ती म्हणजे स्वतः साठी काही करू नये इतरांसाठी काम करत चला कारण तेच इतरांसाठी केलेलं काम कधी स्वतःच होऊन जात कळत ही नाही
याचे उत्तम उदा. म्हणजे सुरेश भारती,सुनील आलूरकर सोमनाथ वाळके ,ज्योती बेलवले,पौर्णिमा राणे,गौरी पाटीलउमेश कोटलवर,माऊली ,रणजीत डिसले,संदीप वाघचौरे,संतोष मुसळे,नदीम खान,आदरणीय तृप्ती ताई,किरण कुंवर मॅडम,जामदार मॅडम,कमळकर साहेब,वणवे साहेब,कडूस साहेब,विजय पवार साहेब,साबळे साहेब, मा.काळपांडे साहेब ,सर्व जिल्हा संयोजक आणि ग्रुप मधील सर्वच जण..
सर्वांच्या नावाचा उल्लेख करणे टाळतो(सम्पूर्ण ATM परिवारातील सदस्य)
प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात पारंगत आहे पण कधीही मी पणा आला नाही की गर्व आला नाही आणि हेच ATM च्या यशाचे गमक आहे असे मी म्हणतो.
पुन्हा एकदा विनम्र पणे या ठिकाणी कबूल करतो कि हे सर्व आपणा मुळे आहे मी फक्त निमित्त आहे.
हे यश आपणा सर्वांचे आहे
असेच सर्वजण या परिवारावर प्रेम कराल,एकमेकांचा आदर कराल आणि मनाचा मोठेपणा दाखवाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो
याठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त केल्या आता काही मोजक्या प्रतिक्रिया या ठिकाणी मुद्दामहून शेअर करतो आवश्य वाचाव्यात
🙏🙏🙏🙏🙏🙏

शिक्षक सावकार झाला का ??
शिक्षक सावकार झाला का?
सध्या मीडियाला बातमीचा पुरवठा कमी झाला का? हा प्रश्न मनात येत आहे. आपल्या चॅनेल चा TRP वाढविण्यासाठी चॅनेल वर देण्यात आलेले शीर्षक 'शिक्षकांची सावकारकी' हे आपणास योग्य वाटते का? आधी झी 24 तास, काल ABP माझा आणि उद्या दुसरं कोणी...चाललंय काय हेच कळायला मार्ग उरला नाही. कोणीही यावं आणि सरकारी शाळा आणि गुरुजींना बदनाम करावं. ABP माझाला माझे काही प्रश्न..
🔹लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडिया कडे पाहिले जाते. सर्वांचा यावर खूप विश्वास आहे. पण हाच मीडिया आता मास्तरचा 'मास्तरडा', 'सावकार' म्हणून उल्लेख करतो. यांच्या अशा वर्तणुकीमुळे यांच्यावर समाजाचा विश्वास राहील का?
एका शिक्षकाच्या वर्तणुकीवरून समस्त शिक्षकांची वर्तणूक तशीच असेल अशी कल्पना करून बातम्या प्रसिद्ध करणे हे पूर्णतः चुकीचे आहे.शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. खाजगी शाळातील मुलांची प्रवेश संख्या रोडावत आहे .हे दिसता क्षणी मीडिया आपला स्वार्थ साधण्यासाठी शिक्षकांवर आसूड उगवताना पाहायला मिळते.
🔹जी घटना घडली ती निंदनीय आहे त्याचे कुणीही समर्थन करत नाही पण एकामुळे आख्खे शिक्षक बदनाम का केले जातात?
🔹कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षक बदनाम करायचा समाजात नकारात्मक वातावरण तयार करायचे
आणि यांची ठरलेली खाजकीकरणाची उद्दिष्टे पूर्ण करायची हा डाव यातून दिसतो.
🔹पुण्यातील काही शाळा टाटा प्रायोगीक तत्वावर चालवायला घेणार याला शिक्षकांनी विरोध सुरु केला होता आणि त्या विषयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी या घटनेला मीडियाने मोठे केले नसेल कशावरून?
🔹एका बाजूला जि प शाळांचा दर्जा सुधारत असताना त्या शाळा आपली गुणवता सिद्ध करत असताना आणि याचा परिणाम खाजगी शाळेतील विद्यार्थी जि प शाळेत यायला लागल्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले व शिक्षकाला बदनाम केल्याशिवाय हे प्रमाण कमी होणार नाही कुटील डाव यामागे दिसतो.
🔹खाजकीकरण, उदारीकरण आणि भूमंडलीकरण यांच्या माध्यमातून या देशातील ठराविक लोकांनी येथील शेतकरी नेस्तनाबूत करण्याचे काम सुरु केले आहे,SEZ च्या माध्यमातून शेती गिळंकृत करण्याचे काम चालू आहे हे मीडियाला दिसत नाही का
आम्ही झालेल्या घटनेचा विरोधच करतो..
पण या प्रकरणातून शिक्षकांना बदनाम करणे हाच उद्देश स्पष्ट होतो.
🔹जे कोणी सावकारकी करत आहेत त्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढले पाहिजे या मताचे आम्ही ही आहोत कारण आम्ही शिक्षक असलो म्हणून काय झाले आधी आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत हे आम्ही विसरलेलो नाही.
त्यामुळे ज्या उस्मानाबाद मधील शिक्षकाने सावकारकी केली त्याला सजा झालीच पाहिजे पण इतर शिक्षकांना बदनाम का केले जाते हे सर्व समाज जाणू शकतो.
🔹खाजगीकरणाच उद्दिष्ट गाठण्यासाठी शाळा आणि शिक्षक याला बदनाम करण्याचं मिडियाच षडयंत्र लोकशाहीला हानिकारक आहे.
🔹मीडिया शिक्षकांची काम का दाखवित नाही? फंड काढून शाळा सुदृढ करणारे शिक्षक का दाखवित नाही? दुष्काळी मदत निधी देणारा शिक्षक का दाखवित नाही? रानोरान फिरून गुणवत्ता जोपासणारा शिक्षक का दाखवित नाही? एक शिक्षक सावकरकी करतोय म्हणून सर्वच करतायत हे समाजमनावर बिंबवणे हा लाजिरवाणा प्रकार दिसतो.
🔹'शितावरून भाताची परिक्षा' अस जर आपण म्हणत असाल तर ते साफ चुकीचं होईल.
निवडणूक काळात पेड न्युज प्रकरणे चालतात..त्यावरून आम्ही पण तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहायचं का?
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे पहिले जाते त्यामुळे आपण व्यक्त होताना किंवा एखाद्याला बदनाम करताना काळजी घ्या.
🔹इतर क्षेत्रातील लोकही पगार घेतात.तो आपल्याला दिसत नाही फक्त शिक्षकांचा तेवढाच दिसतो.समाज घडविण्यात शिक्षकाचा मोठा हात आहे हे आपण विसरलात वाटत.
🔹शिक्षकांचा पगार तेवढाच दिसतो त्याला काय काम असतात यावर आपण कधी बोलत नाही. बोलणं सोप असत करणे खूप अवघड.. जाणून घ्यायचं असेल तर कधी शाळेत प्रत्यक्ष या आणि बघा सर्व गुरुजी तुम्हाला जीवाचं रान करून काम करताना आढळतील.
🔹डाळीत किंवा तांदळात एखादा खडा असेल तर आपण ती डाळ वा तांदूळ फेकून देत नाही त्यावरून त्याची गुणवत्ता ठरवत नाही त्यामुळे एखाद्या शिक्षकाच्या वर्तणुकीवरून सर्व एक जैसे आपण कस काय म्हणू शकता?
तेव्हा समाजाचा आपल्यावर असलेला विश्वास तसाच राहावा अस वाटत असेल तर समाजाची दिशाभूल करणे थांबवा.आपल्याकडे समाज खूप आदराने पाहतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण तो विश्वास सार्थ ठरविला पाहिजे अस मला वाटत. तेव्हा शिक्षण क्षेत्राला बदनाम करून स्वतःच पोट भरवणे थांबवा. शिक्षण क्षेत्रातील चांगल्या बाबी लोकांसमोर मांडा लोक स्वागत करतील.
विक्रम अडसूळ
संयोजक
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
(ATM)

वाड्यावस्त्यावरील शिक्षण संपणार..
"वाडयावस्त्यावरील शिक्षण संपणार"
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
दि २१/०२/२०१६ रोजी शिक्षण आयुक्तालयाने एका पत्राद्वारे महाराष्ट्रामध्ये 20 पटाच्या आतमध्ये असणाऱ्या शाळांची माहिती मागितली आहे.त्यामध्ये सरळ सरळ उल्लेख केला आहे की 20 पटाच्या आतील शाळांमध्ये मुलांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाचा प्रयत्न चालू आहे तसेच सदर शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत समायोजन करण्याच्या दृष्टीने माहिती संकलनाचे काम संपूर्ण महाराष्ट्राभर चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये शाळा अतिशय दुर्गम भागामध्ये आहेत. आताकुठे त्या शाळांवरील छप्पर बाजूला होऊन,कुडाच्या भिंती बाजूला होऊन पक्क्या बांधकामाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. .संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व सरकारी शाळा कात टाकत आहेत आणि अशातच जर त्या शाळा बंद झाल्या तर पुन्हा ही पिढी शिक्षणापासून दूर राहिल्याशिवाय राहणार नाही. शासन या शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे कारण अश्या कमी पट असणाऱ्या शाळांवर खर्च होतो असे म्हटले जाते .
पण आपण जर खालील गोष्टींवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल कि शासनाचा हा निर्णय चुकीचा ठरू शकतो.
🔶20 पटाच्या आतील शाळा बंद करण्यापूर्वी ग्रामीण महाराष्ट्र आणि तेथील भौगोलिक आणि सामाजिक स्थिती जाणून घेणे गरजेचे वाटते
आजही काही गावांपर्यंत जायला साधा रस्ता देखील नाही अश्या ठिकाणी काय वाहतुकीची सोय केली जाऊ शकते ?आजही बरीच गावे केवळ नदी, नाला यावरील पुलांअभावी एकमेकांच्या संपर्कात नाहीत
🔶कोकण किनारपट्टी ,प.महाराष्ट्राचा डोंगरी भाग आणि वनक्षेत्र या भागातील गावांची, तांड्यांची ,वाड्यावस्त्याची लोकसंख्याच मुळात कमी आहे तिथे पट कमी असणारच
मग त्या ठिकाणच्या शाळा बंद करून आपण त्याठिकाणचा शैक्षणिक वारसा बंद करणार आहोत काय ?
🔶अशी बरीच गावे आहेत त्याच्या 4 ते 5 किलोमीटर परिसरात दुसरे गाव नाही अश्या ठिकाणच्या शाळा बंद करून एक प्रकारे तेथील शिक्षणाचा वारसाच संपल्याशिवाय राहणार नाही
🔶1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ही असे स्पष्ट आहे की प्रत्येक प्राथमिक शाळेत किमान दोन शिक्षक असतील व लवकरच प्रत्येक वर्गासाठी एक शिक्षक दिला जाईल
पण ते मिळने सोडून द्या ,आहे त्या शाळा बंद करण्याचा शासन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत दिसत आहे
🔶वय वर्ष 6 ते 10 हे वय जरी गृहीत धरले तर या वयात त्या बालकांना आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या माणसाची आवश्यकता असते तिथे RTE नुसार 30 पटास एक शिक्षक मान्य असून तो देखील आता पर्यंत मिळाला नाही तर ज्या ठिकाणी मुलं स्वतः शिकू शकतात अश्या वयातील मुलांना भरमसाठ प्रा.शिक्षकांचा भरणा केलेला दिसतो
🔶आतायापर्यंत जेवढ्या फिरत्या योजना शासनाने राबविल्या आहेत त्याच्या उडालेल्या फज्याचे आपण साक्षीदार आहोत त्यामुळे यावर वेळीच आपल्यासारख्या विचारी लोकांनी विचार करण्याची आता वेळ आली आहे
🔶गावात ,वस्ती, वाडी ,पाडा, तांड्यावर शाळा असल्यामुळे शिक्षणाचे एक वातावरण गावात निर्माण होत असते ते या निर्णयामुळे नष्ट होऊन शैक्षणिक वारसा नष्ट होईल
🔶या सर्व योजने मध्ये मुलींच्या सुरक्षेची हमी कोण घेणार
🔷 सरकारची अशी कितीतरी खाती आहेत ज्याठिकाणी अमाप खर्च केला जातो .
🔷एकाच कामासाठी दोनदा निधी मंजूर केला जातो .
🔷कोण म्हणते की 20 पटाच्या आतील शाळात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात नाही किंवा मिळत नाही.
🔷माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र शिक्षण विभाग कुमठे बीट ला मॉडेल मानत आहे तेथील बऱ्याच शाळा या 20 पटाच्या आतील आहेत .
🔷मोठया शाळेत गेल्यावर गुणवत्ता पूर्ण शिक्षण सर्वच मुलांना मिळेल यात शंका निर्माण होते.तसेच या समायोजित केलेल्या मुलांची फलश्रुती होईलच यात शंका निर्माण होते.
🔷मुलांना त्या समायोजन केलेल्या शाळेपर्यंत जाण्यासठी वाहतूक व्यवस्था केली जाईल असे समजते,पण ...
🔷काही शाळा अश्या आहेत मुळातच या शाळेपर्यंत यायला सध्याची मुले एक ते दीड किलोमीटर वरून चालत येतात
🔷शासन खर्च करून या सर्व मुलांपर्यंत पोहचून त्या मुलांना शाळेत दाखल करू शकेल काय आणि केलच तर त्यांची दैनंदिन उपस्थिती टिकवू शकेल काय ?
🔷शासनाने जर 20 पटाच्या आतील शाळा बंद केल्या तर शाळा बाह्य मुले वाढतील तसेच शिक्षक हि अतिरिक होतील
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास असे वाटते की वाड्या वस्त्यांवरील मुलांची शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढल्यास नवल वाटायला नको.आता या विषयावर सर्व संघटनांनी एकत्र येवून ठोस निर्णय घेवून शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रती आपली भूमिका बजावली पाहिजे .तसेच आपला सामाजिक वारसा जपला पाहिजे .या निर्णयामुळे कितीतरी शिक्षक बांधव अतिरिक्त होणार आहेत त्यांचे व्यवस्थापन कसे केले जाईल हा प्रश्न असेल
शासनाने दि.२१/०२/२०१६ च्या पत्रात शाळा बंद करा असा आदेश दिलेला नाही परंतु माहिती संकलन करणे ही शाळा बंद करण्याची पहिली पायरी असू शकते म्हणून या विषयावर स्पष्ट बोलता येत नाही परंतु 20 पटाच्या आतील शाळा बंद करण्याच्या निर्णयाला कृतीशील शिक्षक महाराष्ट्र ( Active Teachers Maharshtra ) संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाला 2 मार्च 2016 रोजी निवेदन देऊन 20 पटाच्या आतील शाळा बंद करू नयेत अशी विनंती करणार आहे जर आपना कोणाला या कार्यासाठी सहकार्य करायचे असेल तर
atmaharashtra@gmail.com
या मेलवर मेल करून आपले सहकार्य देऊ शकता
विक्रम अडसुळ
कर्जत अहमदनगर ,
संयोजक
Active Teachers Maharashtra
🌺🌺🌺🌺🌺

गुणगौरव सोहळा
🌹गुणगौरव पुरस्कार सोहळा🌹
दि 11जानेवारी 2016 रोजी
पुणे येथे साई फौंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा "स्वामी विवेकानंद राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार" सोहळा काल मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या सभागृहामध्ये जेष्ठ कवी व 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष आदरणीय फ मु शिंदे,मा संजयजी कोकरे,आमदार जगदीश मुळीक,इतिहास संशोधक भा ल ठाणगे,भूषणकुमार उपाध्याय(अ पो महासंचालक)चित्रपट अभिनेते शशिकांत खानविलकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले
यामध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात आले यामध्ये
🔷सुरेश भारती
🔷सुनील आलूरकर
🔷ज्योती दीपक बेलवले
🔷मनीषा जराड (काटे)
🔷विक्रम अडसूळ
🔷ज्ञानदेव नवसरे
या ATM सदस्यांचा समावेश होता
कार्यक्रम फारच सुरेख व आनंददायी वातावरणात पार पडला
हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील ATM सदस्य उपस्थित होते .यामध्ये
संतोष शिंदे (सातारा),डॉ.नागनाथ येवले(सोलापूर),सदानंद डोंगरे(अहमदनगर),स्वातीताई भालशंकर(पुणे),सुनीताताई काटम(दौंड),तौसिफ परवेज(पुणे),
प्रीती खांडेलवाल(पुणे) स्वेताताई संख्ये(मुंबई),डॉ रामदास काटे (बारामती)
हे ATM सदस्य उपस्थित होते
कार्यक्रमातून फारच सकारात्मक ऊर्जा मिळाली
पुनश्च एकदा सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
संकलन
संतोष शिंदे (सातारा)

Tuesday, December 15, 2015
यवतमाळ कार्यशाळा
यवतमाळ येथे" गुणवत्ता विकास काळाची गरज "या विषयावर यवतमाळ जि प शिक्षक संघाने कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेसाठी 3200 शिक्षक उपस्थित होते
या कार्यशाळेसाठी यवतमाळ च्या खासदार मा. भावना गवळी,
यवतमाळ चे पालकमंत्री मा.संजय राठोड,आर्णीचे आमदार मा.राजूभाऊ तोमसाड, यवतमाळ जि. प अध्यक्षा मा आरतीताई फुफाटे, यवतमाळ चे CEO मा.नागनाथ कलशेट्टी, जि प चे सर्व समिती सभापती उपस्थित होते
आजपर्यंत बर्याच ठिकाणी कार्यशाळा घेतल्या पण 3200 शिक्षकांसमोर बोलायची पहिलीच वेळ
कार्यशाळा छान लोकांचा सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा भावली.

Tuesday, December 1, 2015
भावना
विज्ञानाला इथं उरला नाही थारा,
भाकड कथांचा सांगितला जातो गोषवारा,
तर्काला इथे नाही मुभा ,
नावालाच घेतात मोठमोठ्या महासभा ,
मग खर बोललं कि यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेर निघतात !!
कशाला हवी अशी संस्कृती ,
जी वापरू देत नाही आपली मती ,
जी थांबवेल विकासाची गती ,
संस्कृती विषयी बोललं की यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेर निघतात !!
इथले थोतांड समजवायला अंतराळातून PK आला ,
तरी तुमचा बुद्धिप्रामाण्यवाद सांगा पाहू कोठे गेला ,
म्हणत worng number,worng number
तोडली त्याने सर्वाचीच कंबर ,
PKसारखा चित्रपट आला की यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!
आसाराम रामपाल सारखे भोंदू बलात्कारी ,
स्वतः लाच म्हणतात आम्ही चमत्कारी ,
सोडायला लावतात आपल्याला वज्ञानाची कास ,
सहजच करतात इतिहासच विपर्यास ,
मग खरा इतिहास सांगितलं कि यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!
मंत्राने होतात होतात इथे लोकांचे आजार बरे ,
मग मेडिकल एंट्रान्सचे cut off इतके high का बरे ?
जरा डोकं लावलं तरी यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!
सांगून गेले अनेक संत एकच मर्म ,
कर्मा पेक्षा श्रेष्ठ नाही तो धर्म ,
जो कोणाला देतो जन्मजात सत्तेची गादी ,
तर कोणाला ठरवतो आतंकवादी ,
मग धर्मा विषयी बोललं कि यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!
कधी गांधी ,कधी दाभोलकर ,कधी पानसरे ....
अरे इतक्याने काय होणार ?
पेटून उठलोय आम्ही सारे ,
तुमच्या त्या गोळीने देह संपेल कदाचित ,
पण विचारांच्या बाबतीत आम्ही राहू अपराजित ...
आता तरी तुमच्या या भावनांना आवरा ..
दुभंगला देश आता तरी सावरा..
सुमित जाधव
B E Mech
दौंड
9403772774
Thursday, November 26, 2015
मूल कसं शिकतं भाग -2
मूल कसं शिकतं
भाग -2
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मूल शिकत असताना आपण बारकाइने पाहिले तर वरील गोष्टींचा
अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येते की मूल त्याचे ते ... शिकता शिकता शिकते.
त्याच्या कड़े असलेल्या अनुभवाच्या ,पूर्व ज्ञानाच्या आधारे ते विविध कृतीतुन शिकते हे आपल्या लक्षात येते.
मूल प्रत्येक ठिकाणी शिकत असते.
शाळा, निसर्ग ,परिसर ,समाज व सहकारी यांच्याकडून खुप काही शिकत असते ...
नव्हे वरील घटकांचा परिणाम त्याच्यावर शिकत असताना होत असतो.
🔷शिकणे म्हणजे काय ?असा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर आपल्या असे लक्षात येते की शिकणे ही एक कृतीशिल प्रक्रिया आहे, कारण मूल हे कृतीतुन शिकत असतं अस बऱ्याच शिक्षण तज्ञांचे मत आहे.
🔷ज्यावेळेस मूल शिकत असत त्यावेळेस त्याच्याकड़े काही अनुभव असतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर ते अधिक प्रभावी पणे शिकत असत. विविध अनुभव त्याने जन्मापासून घेतलेले असतात. फ़क्त या काळात वयाचा विचार होणे फार गरजेचे असते.
🔷 प्रत्येक शिक्षकाची अशी मानसिकता असते की माझ्या शाळेतील मूल शिकलं पाहीजे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने त्या मुलास प्रत्यक्ष वस्तु हाताळायला देणे गरजेचे आहे असे मला वाटते.
🔷 शिकणे आणि शिकायला शिकणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर त्यामधे प्रत्यक्ष सहभाग असणे महत्वाचे असतं ,कारण माणूस जेव्हा शिकत असतो तेव्हा मानवी मेंदुमधे नव्या पेशीजलिका निर्माण होत असतात .ज्या माणसाला शिकण्यासाठी उपयोगी पडतात आणि यातूनच शिकण्याची क्षमता ही विकसित होत असते.
🔷शिकणे ही प्रक्रिया व्यक्तिगत घडणारी घटना आहे. ही प्रक्रिया घडत असताना आपण फ़क्त वाचन म्हणजे शिक्षण असे न करता पुस्तका बाहेर ही भरपुर ज्ञान मिळत असते हे तत्व स्विकारुन त्याला समाजात ही वावरु दिले पाहीजे .कारण बालक समाजात ही भरपूर काही शिकत असते.
🔷ज्यावेळेस मूल शिकत असते त्यावेळेस भाषा हां घटक फार महत्वाचा असतो.
कारण मातृभाषेतून विविध संकल्पना मूल लवकर समजून घेते.
त्यामुळे प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण दिले गेले पाहीजे.
🔷मूल शिकत असताना विविध अडचणी त्याला येत असतात आणि येणाऱ्या अडचणी कश्या सोडवायच्या यावर ते विचार करत करत शिकत असते
म्हणजेच नविन आव्हाने बलकाला शिकन्यास प्रवृत्त करत असतात
🔷 शिकणे ही एक सतत चालनारी प्रक्रिया आहे .पण पालक व् समाज यांची असी मानशिकता तयार झालेली आहे की मूल शाळेत आले की लगेच त्याला आले पाहीजे त्याने लगेच सर्व क्षमता प्राप्त केल्या पाहिजेत परन्तु आपन एक गोष्ठ लक्षात घेतली पाहीजे की शिकणे ही निरंतर चालनारी प्रक्रिया आहे
त्यामुळे बालकाला शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला पाहीजे
🔷ज्यावेळेस बालक शिकत असते त्यावेळेस इतरांची नकळत मदत घेत असते
वायगोटस्की म्हणतो-
मुलांच्या शिक्षणाला प्रौढांची मदत होत असते
🔷ज्यावेळेस बालक शिकत असते त्यावेळेस त्याची भावनिक स्थिरता महत्वाची असते कारण भावनिक स्थिरता नसेल तर मूल नाही शिकु शकत
वरील सर्व बाबींचा शिक्षकानी बारकाइने अभ्यास केल्यास किंवा
वरील बाबी स्विकारल्यास मूल हे शिकतच
विक्रम अड़सुळ
9923715464
संयोजक
Active Teacher's Maharshtra (ATM)

मूल कसं शिकतं भाग-1
मूल कसं शिकतं.
मूल कसं शिकतं याचा विचार करताना सर्वात प्रथम भारता मधे कोणत्या शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो हे पाहिले असता आपल्या असे लक्षात येते की प्रामुख्याने दोन शिक्षण पद्धती आपणाला दिसून येतात.
🔷वर्तनवादी शिक्षण पद्धती
🔷रचनावादी शिक्षण पद्धती
वर्तनवादी शिक्षण पद्धतीचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की या पद्धती मधे सर्व शिक्षण तज्ञानी प्राण्यांवर प्रयोग केलेले आपल्या लक्ष्यात येते तर
रचनावादी शिक्षण पद्धतीत मूल हे केंद्रस्थानी मानुन त्याच्या कड़े असणाऱ्या पूर्व ज्ञानाच्या आधारे ते बालक शिकत असतं.
महाराष्ट्रामधे रचनावाद व रचनावादी शिक्षण पद्धती यावर बऱ्याच तज्ञांनी आप आपल्या परीने अभ्यास करुण मूल कसं शिकते हे सांगण्याचा प्रयन्त केला आहे.
आज मितिला सम्पूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत ज्ञानरचना वाद रुजत चालला आहे .
इयत्ता 1 ली ते 5 वी चा अभ्यासक्रम व् पाठ्यक्रम ही रचनावादी बनवला आहे आणि आता इयत्ता 6 वीचा ही रचनावादी पद्धतीने बनविणे चालु आहे.
तसेच सम्पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत ज्ञानरचनावाद
हां शब्द रुजला आहे तसेच त्या पद्धतीने शिक्षक बांधव शिकविण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकाने सुलभकाची भूमिका करत असताना
मूल कसं शिकतं हे ही समजून घेणे महत्वाचे आहे .
मुलं कसं शिकतं.....
🔷लहान वयापासुन मुले कृतीत रमतात.
🔷नवीन शिकण्याचा आनंद मुले लगेच व्यक्त करतात.
🔷साधनांच्या सहाय्याने मुले एकाग्र होतात.
🔷कृती करुन शिकताना संकल्पना स्पष्ट होतात.
🔷स्वयंअध्ययनाने मुले आपली ज्ञानरचना आपणच करतात.
🔷मुले एकमेकांच्या सहाय्याने चांगली शिकतात.
🔷ज्ञान मिळविणे म्हणजे मूर्त अमूर्त विश्वाची ओळख होय.
🔷रचनावाद पद्धतीत मुले आव्हाने घेवून शिकतात.
🔷शिक्षक व् मुले एकत्र शिकतात.
🔷गटात शिकणे ही प्रभावी शिक्षण पद्धती आहे.
🔷स्वतः हुन शोध घेणे ही रचनावादाची मुलभुत क्रिया आहे.
🔷प्रत्येक मूल स्वतंत्रपणे शिकत असत्.
🔷मुले इतरांचा भावनिक आधार होवू शकतात नव्हे होतात.
🔷मुक्त संभाषणातून भावनिक प्रतिक्रियाला संधी मिळते.
🔷कलेतून बालकाचा विकास साधता येतो.
🔷एकाग्रता ही आवडत्या कामातून जन्माला येते.
या वरील गोष्टींचा सर्व साधारण पणे
बारकाइने अभ्यास केल्यास मूल कसं शिकतं हे जाणून घेण्यास मदत होईल
कारण सध्या काळानुरूप बदलले पाहीजे.
प्रत्येक शिक्षक आप आपल्या परीने शिकविण्याचे व् सुलभक म्हणून काम करत असतो फक्त जराशी वरील मुद्यांचा विचार केल्यास मूल समजून घेण्यास प्रत्येकाला मदत होईल.
चला तर मग रचनावादी पद्धतीने अध्यापन करून
शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र
प्रगत करुया.
विक्रम अडसुळ
संयोजक
Active Teacher Maharashtra (ATM)

Subscribe to:
Posts (Atom)
कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल
-
ज्ञानरचनावाद राबवताना..... आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानरचावाद शैक्षणिक क्षेत्रात रुजला आहे परंतु अजुनहीआमचा शिक्षक गोंधळलेला...
-
*स्पेशल डे.. स्पेशल डिश..* *चिकन बिर्याणी* 🥘🥘🥘🥘🥘🥘🥘 बऱ्याच दिवसापासूनची मुलांची इच्छा आज पूर्ण झाली. आज जि.प.प्राथ.शाळा बंड...
-
*बारामती शिक्षण परिषद* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *दि 24 व 25 जुलै 2015 या कालावधीतअहमदनगर,सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यातील केंद्रप्रमुख,विस्ताराध...