Saturday, April 21, 2018
अहमदनगर (कोकमठाण)कार्यप्रेरणा परिषद
🏆 *नगरची कार्यप्रेरणा परिषद* 🏆
🌋 *आधी केले..मग सांगितले*!🌋
🎯.. *चाललो आम्ही प्रगत च्या दिशेने*!
🏇🏇🏇🏇🏇
दि. २६ सप्टे. २०१६ सोमवार कोपरगावातील कोकमठाण येथून !
मोठया आनंदाच्या अन उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या कार्यप्रेरणा परिषदेचा *अनुभलेला वृत्तांत* जसा आठवला तसा !
*संधी साधू* च्या जमान्यात चांगल्या माणसानं पुढं आलं पाहिजे... आपलं काम इतरांनां दाखवलं पाहिजे .. *जग बदलतंय आपणंही थोडं बदललं पाहिजे* .. असं सांगून चांगलं काम करणाऱ्या माणसांना नेहमी चांगल्या *संधी* मिळतात अन मिळालेल्या संधीचं नेहमी सोनं करावं असा *परीस- मंत्र* सांगणारे नगर जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्रा.) मा. श्री. अशोक कडूस साहेब यांनी कोपरगाव शिक्षण विभागावर जिल्हास्तर परिषद घेण्याचा *विश्वास* दाखवला अन तुम्ही छान करु शकता असा *आत्मविश्वास* देवून तयारीला लागा अशा सुचना केल्या.इतकंच सांगून साहेब थांबले नाही तर त्यासाठी मदत , मार्गदर्शन करण्यासाठी राहुरीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम.पटारे मॅडम व अनुभवी विस्तार अधिकारी वाकचौरे साहेब यांनाही आवश्यक सुचना केल्या.
त्यानुसार राहूरीच्या ग.शि.अ.मा. श्रीम.पटारे मॅडम, आम्हा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे बापू आदरणीय डी.डी. वाघचौरे साहेब, व कोपरगावच्या प्र. ग. शि. अ. शबाना शेख या त्रिमुर्तींच्या कल्पकतेतून , मार्गदर्शनातून आणि नियोजनातून कोकमठाणच्या आत्मा मालिकच्या महादेवी हॉल मध्ये २६ सप्टे. २०१६ ची कार्यप्रेरणा परिषद संपन्न झाली.
ज्यांच्यासाठी आपण हे सर्व काही करतो आहोत त्या विदयार्थ्यांच्या सादरीकरणापासून परिषदेची सुरवात करण्याचा उद्देश फक्त आणि फक्त *जाणिवेची जाणिव* निर्माण करणं हाच होता.
साध्या.. सोप्या.. सरळ शब्दातील प्रास्ताविकातून मा. कडूस साहेबांनी कार्यप्रेरकांसमोर अहमदनगरची पी.एस.एम.बाबत पार्श्वभूमी मांडली जी कार्यप्रेरकांच्या टीमला देखील परिषद यशस्वी करण्यासाठी पूरक ठरली.. तसंच साहेबांना दाखवण्यासाठी नव्हे तर आत्मीक समाधानासाठी काम करा असं आवाहनही या वेळी कडूस साहेबांनी उपस्थितांना केलं.
आजच्या परिषदेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आदर्शवादापेक्षा *वास्तववाद* आणि *कार्यवाद* यावर भर.. काय करणार? .. काय असावं?.. कसं असावं? यापेक्षा *काय केलं अन कसं केलं*.. ते करताना *अडचणी* काय आल्या अन त्या *कशा सोडवल्या* यावरच फक्त फोकस !
एक प्रकारे बाप दाखव नाही तर श्राध्द घाल... असंच काही बोललं तर ते वावगं ठरू नये... जे केलंय तेच दाखवता येतं ! नुसतं फेकायचं अन समोरच्यानं गुंडाळायचं असा काळ नाही राहिला आता ! आज परिषदेत प्रत्येक नाणं ( सादरकर्ता ) खणखणीत होतं.
*जिवंत माणुसंच जिवंत माणसांच्या अंगावर शहारा आणू शकतो* .. रोमांच निर्माण करू शकतो हे *भावनिकतेचा मास्टर माईंड* कार्यप्रेरक दादासाहेब नवपुते या गुरुजींना ऐकताना आम्ही अनुभवत होतो.
दादांनी एक साधा *चेंडू* आणि तीन - साडेतीन *फुट दोरी*च्या मदतीनं गंजत चाललेल्या मानसिकतेला दुरुस्त करण्यासाठी.. डोक्याला *झिणझिण्या आणणारं वास्तव* उभं केलं ... नुसतं *वास्तव* मांडलं नाही तर त्याला *तोडगा* सुद्धा सांगितला.
दादांनी मुल समजून घेताना मी बदललं पाहिजे.. मी बदललो तर जग बदलेल हे पोटतिडकीने सांगताना *आजारी विदयार्थ्याच्या घरी सदिच्छा* भेट उपक्रमात *पाच रुपयाचा बिस्कीट पुडा* सुध्दा क्रांती घडवून आणू शकतो हे दाखवून दिलं.. मुलांसमवेत जेवा.. मुलांच्या आवडी निवडी जपा.. *वाटाण्याची बेरीज* अन *वजाबाकीतून हरबरे* असे साधे साधे उपक्रम सुचवून सर्वांना रोमांचित अन प्रेरित सुध्दा केलं.
*श्री.प्रकाश कांबळे* .. दुसरे कार्यप्रेरक.. वय वर्षे ५४.. चार वेळेस ओपन हार्ट सर्जरी.. दुर्गम भागात नोकरी.. कुठं वर्धा .. कुठं औरंगाबाद ..बीड.. अन आज कोपरगाव.. प्रचंड प्रवास.. *प्रचंड ऊर्जा.. अन उत्साह*.. ! डिस्कवरी चॅनेलने नोंद✍ घेतली या माणसाची मी काय लिहीणार या माणसाबद्दल ! स्वतःच्या खिशातून तीन लाख रुपये शाळेला खर्च करणाऱ्या या माणसाच्या कार्याला सलाम💐🙏 !
तिसरं व्यक्तिमत्व *श्री. रमेश ठाकूर* ! अगोदर शिक्षकांचा मित्र अन नंतर विस्तार अधिकारी ! *खुर्चीवरुन फरचीवर* बसणारा.. जीव तोडून काम करू नका तर *जीव जोडून काम करा* असं सांगणारा.. *दीड* घंटयांचा संदेश *दीड* मिनटाच्या बदकाच्या पिलांची क्लिप मधून सांगणारा .. अधिकारी.. सर्वांनाच भावलेला माणुस ! पी.एस.एम. चा साधा सोपा अर्थ ज्या सरळ पध्दतीनं त्यांनी मांडला तो काळजाला भिडणारा होता. *मुले* ऐवजी *मुल*. हा *मुल मंत्र* सांगताना मला काय करायचं? का करायचं ?अन आहे त्या परिस्थितीत उत्कृष्ट कसं करु ही *त्रिसुत्रीही* मांडली.
अधिकारी - शिक्षक यांच्यातील *भीती*.. तिचा परिणाम शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील भितीवर.. तिचा परिणाम विदयार्थी अन अभ्यास यांच्यातील भितीवर .. या अनिस्ट भिती चक्रातील दोन घटका दरम्यानची *भितीची भिंत* जर पाडली तर आपोआप *गुणवत्तेचं मंदिर* निर्माण होईल हेच ठाकूर सरांच्या व्यक्तिमत्वातून दिसलं! ठाकूर आडनावाची माणसंच ग्रेट👌 !
आजच्या परिषदेच्या कार्यप्रेरकांच्या लिडर नेवासाच्या गटशिक्षण अधिकारी *श्रीम.साईलता सामलेटी* लिडर या पदाला खरोखरच शोभत होत्या.. अन त्याप्रमाणं न्यायही देत होत्या.. नम्रता हा त्यांचा दागिना वाटला.. असंख्य पुस्तकात वाचलेलं यशाचं *श्रेय इतरांना दया .. अन मोठे व्हा* ! हा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कृतीतून ..बोलण्यातून दिसत होता.. ! त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय हे त्यांच्या पूर्ण टिमला दिलं.. टिमकडूनही खूप शिकायला मिळालं असं सांगून यशाचं हे रहस्य सांगताना कॉपी करु नका, ईतरांना मदत ही स्वतःला मदत , *चोरी मधाची होईल पण गुणवत्तेची मुळीच नाही* या आशयाच्या प्रेरणादायी बाबी यावेळी शेअर केल्या.
खरं तर आमच्या जिल्हयातून काहीतरी घेवून जाण्यासाठी बाहेरुन (वर्धा, औरंगाबाद ) आलेली ही *प्रेरक मंडळी* आम्हालाच खूप काही देवून गेली !
जिल्हयातील विक्रम अडसूळ यांच्या बंडगर वस्ती शाळेचा *ए.टी.एम.* उपक्रम, केंद्र प्रमुख रामदास मोरे यांचं दुष्काळी भागात *आय.एस.ओ*., *ध्येयवेडे* ज्ञानेश्वर इंगळे सरांची स्वप्नातील शाळा, *शिक्षकांप्रती तळमळ* असलेले केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत देशमुख यांचं शिक्षकांनी वाचलं पाहिजे, *अॅक्टीव* विस्तार अधिकारी (शि) श्री. संभाजी झावरे यांनी बिटाची प्रगती -सांख्यिकी आधार , तर कोपरगावच्या गटशिक्षण अधिकारी श्रीम.शबाना शेख यांनी पी.एस.एम. साठी राबवलेले उपक्रम,केलेले नियोजन, अंमलबजावणी इ. बाबींवर प्रकाश टाकून प्रेरणा निर्माण केली.
खरं तर आजच्या परिषदेचं इतिवृत्त लिहिण्यासाठी श्री. खैरे, श्री. खरात व श्री. गोसावी यांना सांगितले पण ते परिषदेतील वातावरणात इतके *इनव्हॉल्व* झाले होते की त्यामुळे ते लिहू शकले नाही. *देहभान हरपून जाणे* म्हणजे तरी दुसरे काय..?ते ही या निमित्ताने पहायला मिळाले.तीच *यशस्वीतेची पावती* !
बोलण्यासाठी संधी मिळाली की त्याचंही सोनं करणारी माणसं असतात पण *संधी* नावाखाली *हौस* नावाचं पिक येवू नये म्हणून नियोजनात घंटी (बेल)🔔 नावाचं *प्रतिजैवक* वापरलं गेलं म्हणून घंटींला 🔔आवर्जुन धन्यवाद 🙏लिहावेच लागतील ! सांगण्याचं तात्पर्य *सुक्ष्म नियोजनाचा* तो एक भाग ! यशस्वीतेचं श्रेयाचा आणखी एक मानकरी .. सर्वाना सर्व काही मनापासून सांगणारा .. दाखवणारा एल.ई.डी. ! शेवटचा *कोपरा* देखील ठेवला त्यानं *हसरा*.
सक्रीय, उपक्रमशील शिक्षक *भाऊसाहेब चासकर, संदीप वाकचौरे सर* यांच्यासारखे सभेला दोन -दोन तास खिळवून ठेवणारे गुरुजी तसेच शिक्षण क्षेत्राचा व्यासंग अन प्रशासनाचा प्रदिर्घ अनुभव असणारे मा.गट शिक्षण अधिकारी श्री. *हराळ साहेब*, श्री. *पावसेसाहेब*... शेवगावचे श्री. बुगे साहेब.. रहाता बी.ई.ओ. शिवगुंडे मॅडम , संगमनेरचे आर.एम. गायकवाड, पाथर्डीचे कराड बंधू ..यांनीही आजच्या परिषदेतील सर्व सादर कर्त्यांना *मनापासून दाद* दिली व त्यांचे *अभिनंदन* करुन *कौतूकही* केले.. *नवनविन हिरे शोधणे.. अन त्यांना पैलू पाडणे* .. ज्ञानाचा कौशल्याचा वारसा *संवर्धन व संक्रमण* असाच उद्देश यापुढील काळात परिषदांचा राहील असे वाटते.
परिषदेत आत्मा मालिक कुलातील प्राचार्य डांगे सरांनी आपल्या मधुर वाणीनं कुलातील मराठी माध्यमाची स्पर्धा .. गौरवपुर्ण इतिहास व वर्तमान चा आलेख मांडून आम्ही उपक्रम सांगून आमचं *सिक्रेट* सांगत नाही तर *रिझल्ट देतो* असं सांगून यशाचं रहस्य खुलं करुन गेले अन *प्रेरणाही* देऊन गेले.
सकाळचा ९ चा नाष्टा.. दोन वेळचा चहा .. दुपारचं दीडचं जेवणं.. डायटच्या श्रीम.निशीगंधा चौधरी यांनी कार्यप्रेरक व सादरीकरण केलेल्या व्यक्तींचा पुस्तक देवून ते करत असलेल्या कामाचा गौरव व मार्गदर्शन .. तसंच प्रत्येकानं विचारपिठावरुन उत्तम काम करणाऱ्या व *धडपडणाऱ्या व्यक्तिंचा नामोल्लेख करुन केलेला सन्मान*.. प्रातिनिधिक स्वरुपात आदर्श गुरुजी संदीप वाकचौरे यांचा सत्कार आदी घटना सुध्दा प्रेरक होत्या.
परिषदेस जिल्हातील सर्व तालूक्यातून गट शिक्षणाधिकारी, मुख्यालयाचे व तालूक्याचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख , शिक्षक, सर्व बी.आर.सी. चे विषय तज्ञ ,मोठया संख्येने व पुर्णवेळ उपस्थित होते. सदैव काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लोकप्रतिनिधी ..पं.स. कोपरगावचे सभापती मा.श्री. सुनिलराव देवकर यांची उपस्थिती आम्हाला आमच्या कामाची पावती देऊन गेली.
५.३० वाजेपर्यंत चाललेल्या परिषदेत गीतगायन जि.प. सोनेवाडी च्या विदयार्थ्यांनी केले..व माने सरांच्या गीत मंचाने मनं जिंकली.. उत्कृष्ट सुत्रसंचलन करणारे श्री. कहांडळसर , त्यांना सहकार्य करणारे फैय्याज पठाण सर.. तसेच उपस्थितांचे ऋण व्यक्त करताना श्री.डी.डी. वाकचौरे साहेबांनी दिवसभर उभे राहून तत्पर सेवा देणाऱ्या कर्मचारी, तंत्र स्नेही शिक्षक व पडदयामागील सर्वांचा उल्लेख करुन *गौरव* केला व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
राज्यात सुरु असलेल्या प्रेरणा परिषदेसाठी *नगर जिल्हयाला* मिळालेल्या *कार्यप्रेरक टीमची* वरिष्ठ व एस.सी.ई.आर.टी. यांनी विशेष नोंद घ्यावी ही *विनंती*. ! या टिम बरोबर जो चव्हाण आडनावाचे ड्रायव्हर... एका रात्रीच्या मुक्कामाच्या निमित्ताने एका चांगल्या मित्राची.. माणसातल्या *एका चांगल्या माणसाची* ओळख झाली. हा *माणुस निवडताना* एस.सी.ई.आर.टी. ने घेतलेली दक्षता ही सुध्दा एक प्रेरक आणि वैशिष्ट्यपुर्ण बाब ! नेहमीच *नंबर वन* राहणाऱ्या नगरकरांना नंबर वन साठी शुभेच्छा !💐💐💐
चांगला शर्ट शिवताना नक्कीच चिंध्या सुध्दा पडतात तसं हे सगळं करताना काही उणिवां देखिल नक्कीच राहिल्या असतील कार्यक्रमात अन लिहिताना सुध्दा यात शंका नाही. त्या बद्दल क्षमस्व व दिलगिरी🙏 ..पण नेक्स टाईम त्या चिंध्यांचं *उशी* नाही तर किमान *डस्टर* शिवण्यासाठी तरी त्याचा नक्कीच उपयोग होईल या आशावादासह सर्वाना पुनश्च शुभेच्छा.💐💐💐
✍✍✍
*शंकर आ. गाडेकर*
विस्तार अधिकारी (शिक्षण)
पंचायत समिती , कोपरगाव
*प्रेरणा व मार्गदर्शन*
श्रीम.शबाना शेख
प्र.गट शिक्षण अधिकारी
पंचायत समिती, कोपरगाव
📕📓📗📘📙📔📒🖍

Subscribe to:
Posts (Atom)
कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल
-
मूल कसं शिकतं भाग -2 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 मूल शिकत असताना आपण बारकाइने पाहिले तर वरील गोष्टींचा अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येते की...
-
*बारामती शिक्षण परिषद* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *दि 24 व 25 जुलै 2015 या कालावधीतअहमदनगर,सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यातील केंद्रप्रमुख,विस्ताराध...
-
*स्पेशल डे.. स्पेशल डिश..* *चिकन बिर्याणी* 🥘🥘🥘🥘🥘🥘🥘 बऱ्याच दिवसापासूनची मुलांची इच्छा आज पूर्ण झाली. आज जि.प.प्राथ.शाळा बंड...