Saturday, October 8, 2016

फडक्यातली भाकरी...

*फडक्यातील भाकरी*
🍪🍪🍪🍪🍪🍪

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

काल दुपारची जेवणाची सुट्टी.
आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मुले व मी एकत्र शाळेच्या व्हरांड्यात जेवणासाठी बसलो होतो.सर्वांनी आपापला डबा उघडून जेवायला सुरुवात केली सोबत पोषण आहार ही होता
चौथीच्या वर्गातील प्रतिक्षाने डब्यात बाजरीची भाकरी आणलेली पण ती जेवणा डब्याशी कसलीतरी झटापट चालू होती तिची ..
मी न राहवून विचारले काय झाले मग तिच्या शेजारी बसलेल्या दीपाली ने सांगितले
*सर ...*
*तिच्या डब्यातून भाकरी निगत नाय..*
मग मी म्हणालो बघू मी काढून देतो ..मलाही डब्यातील भाकरी निघेना...😔😔
कारण ही तसेच होते
भाकरी डब्यात इतकी फिट्ट बसली होती की हाताने निघेना
मग आम्ही शाळेतील भातवडीचा वापर करून डब्यातील भाकरी काढली..
मला ही बाजरीची भाकरी पाहून खाण्याचा मोह आवरला नाही. कारण ही तसेच..
 सध्या खरिपाची पिके निघाली आहेत नवीन बाजरी झाली आहे ..अन मीठ टाकून बनवलेली बाजरीची खाण्यात मजा काही औरच असते.
मग आमच्या बाजरीच्या भाकरीवर खूप गप्पा झाल्या.
भाकरी कशी बनवली पाहिजे,भाकरीसोबत काय छान लागते...असे बरेच काही..
मी काल बोलता बोलता बोलून गेलो होतो की डब्यात भाकरी कडक राहत नाही ती चिकटते या साठी फडक्यात बांधून आणलेली भाकरी कडक राहते व चवीला हि छान लागते..
*मी लहान असताना माझी आई मला फडक्यात भाकरी बांधून द्यायची असं खूप काही बोललो*
*लहानपणीच्या माझ्या बालआठवणी जेवण करताना मुलांना सांगितल्या*

*अन आज.....*

दुपारी जेवणाची सुट्टी झाली मी प्रश्नार्थी  शब्द हे शैक्षणिक साहित्य बनवत होतो काम चालूच होते.मुलांना जेवायला बसा सांगितले मी येतोच असं म्हणून.पण कामामुळे 5 मिनिट झाले तरी लक्षात नाही आले की जेवायचे

दीपाली दरवाज्यापाशी घुटमळत होती म्हणून मी तिला थोडं मोठ्या आवाजतच बोललो ..
जा बस कि जेवायला ...
पण ती जाईना..
मग मी विचारले का जेवणास तेव्हा तिने जे उत्तर दिले त्या उत्तराने माझ्या हातातील काम आपोआप बंद पडले आणि मी खुर्चीवरून ताडकन उठलो....
माहितेय तिने काय सांगितले

*स चला ना जेवायला*
*मी फडक्यात बाजरीची अन मिरचीची ठेचा आणलाय..*

खरच क्षणभर विचारात पडलो
लेकरं किती जीव लावतात आपल्याला,
किती प्रेम करतात,
किती आत्मीयता असते मुलांची आपल्याशी,
क्षणभर तृप्तीताई समोर उभ्या राहिल्या अन त्यांचा शब्द आठवला ....
*सर्वात प्रथम प्रत्येक शिक्षकाने मूल समजून घेतले पाहिजे*
खरंच मूले फार जीव लावतात आपल्याला..

*आजचे जेवण खरच इतके चविष्ट होते की पंचपक्वांन ही या माझ्या दीपालीने  आणलेल्या फडक्यातील भाकरीपुढे फिके ठरले असते*

आजचा दिवस खूप काही  शिकवून गेला
🙏🙏🙏🙏🙏

कर्जत तालुकास्तरीय शिक्षण परिषद

*शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र स्तरावर शिक्षण परिषद घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज *दि.17 सप्टेंबर 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा. अशोक कडूस साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील केंद्र स्तरावरील शिक्षण परिषद पार पडल्या.*
*याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील सर्व केंद्रातील शिक्षण परिषद मा. गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.*
या परिषदेमध्ये केंद्रातील ज्या शिक्षकांचे प्रगत वर्ग आहेत,प्रगत शाळा  आहेत ,तसेच ज्या शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे अश्या शिक्षकांनी आपल्या शाळेचे सादरीकरण व्हिडीओ,पीपीटी यांच्या साहाय्याने केले.यावेळी सम्पूर्ण वातावरण सकारात्मक झालेलं दिसून आले.

*राशिन केंद्राच्या परिषदेमध्ये आदरणीय शिक्षण आयुक्त मा. धीरज कुमार साहेब व मा. शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांनी मोबाईल फोन वरून शिक्षकांशी संवाद साधला व एकंदरीत परीषदेचा  आढावा घेतला .आदरणीय साहेबांच्या या फोन संदेशा मुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून येत होते.*

*यानंतर कोरेगाव केंद्रातील शिक्षण परिषदेमध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी असणारा ..स्फूर्तीचा अखंड झरा..आधुनिक सावित्रीमाई लातूरच्या गटशिक्षणाधिकारी आदरणीय मा.तृप्ती अंधारे यांनी फोन द्वावारे शिक्षकांशी संवाद साधला.*एकंदरीतच आज संपूर्ण कर्जत तालुका शिक्षणमय झालेला दिसून आला.
प्रत्येक शिक्षक आपण करत असलेले काम इतरांना समजून सांगत होता,आपल्या यशाचे गमक सांगत होता,तसेच स्वतः ची शाळा प्रगत करण्यासाठी ,समृद्ध करण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या हे हि सांगत होता.यातून प्रत्येक  शिक्षकाला नवीन दिशा मिळत होती.
आज एकंदरीतच प्रत्येक शिक्षक माझ्या शाळेतील प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी काय करता येईल हे एकमेकांना सांगत होता

आजचे आदरणीय मान्यवरांचे फोनवरील मार्गदर्शन,शिक्षकांशी साधलेला संवाद खूपच प्रेरणादायी ,सकारात्मक ऊर्जा देऊन गेला.

आजची ही शिक्षण परिषद पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी,उपक्रमशील शिक्षक व कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. शिंदे साहेब या सर्वांनी परिश्रम घेतले

*मी एक शिक्षक म्हणून मला काही केंद्रामध्ये माझ्या शाळेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली ,माझ्या शाळेचे काम मला सादर करता आले हे मी माझे भाग्य समजतो.*

खरच केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदेचे आयोजन हा शासनाने घेतलेला स्तुत्य उपक्रम... असेच मी तर माझ्या शब्दात वर्णन करेल...
🙏🙏🙏🙏🙏


*विक्रम अडसूळ*
*कर्जत ,अहमदनगर*

*9923715464*

💐💐💐💐💐💐

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल