Tuesday, December 15, 2015

यवतमाळ कार्यशाळा

यवतमाळ येथे" गुणवत्ता विकास काळाची गरज "या विषयावर यवतमाळ जि प शिक्षक संघाने कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेसाठी 3200 शिक्षक उपस्थित होते
या कार्यशाळेसाठी यवतमाळ च्या खासदार मा. भावना गवळी,
यवतमाळ चे पालकमंत्री मा.संजय राठोड,आर्णीचे आमदार मा.राजूभाऊ तोमसाड,  यवतमाळ जि. प अध्यक्षा मा आरतीताई फुफाटे, यवतमाळ चे CEO मा.नागनाथ कलशेट्टी,  जि प चे सर्व समिती सभापती उपस्थित होते

आजपर्यंत बर्याच ठिकाणी कार्यशाळा घेतल्या पण 3200 शिक्षकांसमोर बोलायची पहिलीच वेळ
कार्यशाळा छान लोकांचा सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा भावली.



Tuesday, December 1, 2015

भावना



विज्ञानाला इथं उरला नाही थारा,
भाकड कथांचा सांगितला जातो गोषवारा,
तर्काला इथे नाही मुभा ,
नावालाच घेतात मोठमोठ्या महासभा ,
मग खर बोललं कि यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेर निघतात !!


कशाला हवी अशी संस्कृती ,
जी वापरू देत नाही आपली मती ,
जी थांबवेल विकासाची गती ,
संस्कृती विषयी बोललं की यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेर निघतात !!

इथले थोतांड समजवायला अंतराळातून PK आला ,
तरी तुमचा बुद्धिप्रामाण्यवाद सांगा पाहू कोठे गेला ,
म्हणत worng number,worng number
तोडली त्याने सर्वाचीच कंबर ,
PKसारखा चित्रपट आला की यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!

आसाराम रामपाल सारखे भोंदू बलात्कारी ,
स्वतः लाच म्हणतात आम्ही चमत्कारी ,
सोडायला लावतात आपल्याला वज्ञानाची कास ,
सहजच करतात इतिहासच विपर्यास ,
मग खरा इतिहास सांगितलं कि यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!

मंत्राने होतात होतात इथे लोकांचे आजार बरे ,
मग मेडिकल एंट्रान्सचे cut off इतके high का बरे ?

जरा डोकं लावलं तरी यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!

सांगून गेले अनेक संत एकच मर्म ,
कर्मा पेक्षा श्रेष्ठ नाही तो धर्म ,
जो कोणाला देतो जन्मजात सत्तेची गादी ,
तर कोणाला ठरवतो आतंकवादी ,
मग धर्मा विषयी बोललं कि यांच्या भावना दुखावतात !
अन बंदुकीच्या गोळीतून त्या बाहेरही निघतात !!

कधी गांधी ,कधी दाभोलकर ,कधी पानसरे ....
अरे इतक्याने काय होणार ?
पेटून उठलोय आम्ही सारे ,
तुमच्या त्या गोळीने देह संपेल कदाचित ,
पण विचारांच्या बाबतीत आम्ही राहू अपराजित ...


आता तरी तुमच्या या भावनांना आवरा ..
दुभंगला देश आता तरी सावरा..


सुमित जाधव
B E Mech
दौंड
9403772774

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल