Saturday, July 11, 2015
वेच्या गावित
मायेची पाखर.
वेच्याचा वेचक वेधक प्रसंग.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आज इयत्ता चाैथीच्या मुलांना मायेची पाखर पाठ शिकवत हाेताे. माझ्याकडे जाेड वर्ग असल्याने इयत्ता दुसरीची मुलेही ऐकत हाेती. मी पाठ शिकवतांना एवढा गुंग झालाे की कर्मवीर भाऊरावांच्या त्या कार्याने माझे डाेळे पाणावले. गाेरगरिबांच्या व पाेरकी झालेल्या मुलांना त्यांनी आई वडिलांसारखे प्रेम दिले. हे वाचून मन भरून आले.शाळेतील मुलांवर आणि माझ्या स्वत :च्या मुलांवर मी किती प्रेम करताे ? तेवढा वेळ मी देताे का ? कर्मवीरांसारखी माणसे दुसऱ्यांच्या मुलांवर एवढी माया, प्रेम देवू शकतात यांच्याकडे किती माेठा दृष्टिकोण, व विचार हाेता. हयाच विचारात मी थाेडा वेळ राहिलाे. काही वेळाने
माझ्या डाेळयांत पाणी आले हे पाहून दुसरीतला मुलगा म्हणाला. "सर, सर मी एक गाेष्ट सांगू हां सर, सांगू मी बाेललाे सांग बरं काय सांगताेस ते लवकर.. सर
माझ्या घरी गाय आहे ती ना व्यालेली. तिकडे चरायला साेडलेले ना व्हाेळात तिकडेच. मग ना ते वासरू पाण्यात भिजलेले दाेन दिवस वासरू व्हाेळातील थाेडयाशा पाण्यातच हाेते. दुसऱ्या दिवशी माझ्या बाबांना समजले आपली गाय कुठेतरी व्यायली आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी चरायला साेडले आणि तिच्या पाठीपाठी गेलाे तर ना ती त्या पिल्लाला ना जिभेने चाटत हाेती. आम्ही जवळ गेलाे की अंगावर धावायची मग ना माझ्या बाबांनी वासरूला उचलले आणि घरी आणले ते लुकलुक डाेळे ना काढून दाखवायचे हां, मग ना आम्ही गायीला दांडयाला बांधले दुध काढले आणि त्याला बाटलीने पाजले पण ना संध्याकाळी वासरू मेले मला रडू आले. सगळयांना खुप ना सर वाईट वाटले. मी रडतच हाेताे मग ना सर माझ्या बाबांनी ते वासरू व्हाेळाकडे नेले. मी पण साेबत हाेताे. तर ना, आमच्या मागून गाय दांडा ताेडून हंबरत धावत आली. आणि आम्ही जिथे वासरू ठेवलेले तिथे येवून पुन्हा ना चाटायला लागली. मग पुन्हा गायीला आजाेबा न मी घरी घेवून गेलाे, तर तिला चारा दिला ना सर तरी पण खात नव्हती तिच्या डाेळयात ना सर मी पाणी येतांना पाहिले. मग ना सर मला रडू आले.... सर आमची गाय बघायला याल ना सर तुम्ही.... लाल कलरची आहे. हां सर याल..?.??.. सांगा ना ? सर........ मी म्हणालो, येईन. कधी सर.?..... शाळा सुटल्यावर.. चला आम्ही निघालाे मायेची करूणेची, ममतेची, दयेची, प्रेमाची अशा गाैमातेला प्रणाम करण्यासाठी जिने माझ्या विद्यार्ध्यांला एवढा माेठा संस्कार दिला..
🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄...🐄 गौमाता सृष्टि की देन है. इसे बचाईये उसका पालनपाेषण करे. अपना जीवन समृद्ध करे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल
-
मूल कसं शिकतं भाग -2 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 मूल शिकत असताना आपण बारकाइने पाहिले तर वरील गोष्टींचा अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येते की...
-
*बारामती शिक्षण परिषद* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *दि 24 व 25 जुलै 2015 या कालावधीतअहमदनगर,सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यातील केंद्रप्रमुख,विस्ताराध...
-
*स्पेशल डे.. स्पेशल डिश..* *चिकन बिर्याणी* 🥘🥘🥘🥘🥘🥘🥘 बऱ्याच दिवसापासूनची मुलांची इच्छा आज पूर्ण झाली. आज जि.प.प्राथ.शाळा बंड...
छान
ReplyDelete