*बारामती शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*दि 24 व 25 जुलै 2015 या कालावधीतअहमदनगर,सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यातील केंद्रप्रमुख,विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची दोन दिवशीय विभागीय कार्यशाळा पार पडली.वास्तविक पाहता यातील मी कसलाही* *प्रशासकीय अधिकारी नाही तरीही मला या कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब यांनी दिली त्याबद्दल साहेबांचे प्रथमतः आभार व धन्यवाद*
🙏🙏🙏🙏
पहिल्या दिवशी काही शाळा तसेच केंद्र स्तर व गटस्तरावरील सादरीकरण झाले ,प्रथम दिवशी *आदरणीय नामदेवराव जरग साहेब* दिवसभर कार्यशाळेसाठी उपस्थित होते.साहेबानी अगदी समर्पक असे प्रश्न विचारत सभागृह बोलते केले आणि प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी आपण काय केले पाहिजे हे त्यांनी त्यांच्या समर्पक शब्दात सांगितले
त्याचबरोबर *आदरणीय दिनकर टेमकर साहेब* हे ही या परिषदेसाठी दोन दिवस उपस्थित होते,त्यांनी हि सभागृहाला योग्य असे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी त्यांच्या सेवाकाळातील काही उदाहरणे देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आलेल्या प्रसंगांना कसे सामोरे गेले हे त्यांनी सांगितले .आदरणीय साहेबानी दिलेल्या उदाहरनांपैकी नांदेड जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी असताना फोन वर घडलेला किस्सा सांगितला आणि सभागृहात एकच हस्या पिकला
आदरणीय साहेबानी या परिषदेसाठी फार कष्ट घेऊन परिषद यशस्वी केली
जिल्हास्तारावरील सादरीकरणात *आदरणीय अशोक कडूस (शिक्षणाधिकारी अहमदनगर)* *मुस्ताक शेख(शिक्षणाधिकारी* पुणे) ,घाटगे साहेब (शिक्षणाधिकारी सोलापूर) तसेच डायट प्राचार्या मेटे मॅडम व औटें मॅडम यांनी सादरीकरण केले ,यामध्ये प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेतला
आदरणीय कडूस साहेब यांनी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक मूल शिकण्यासाठी काय केले ?
काय करत आहे ? पुढील दिशा समजावून सांगितली
गटस्तरावरील सादरीकरणात
पंढरपूरच्या *गटशिक्षणाधिकारी *सुलभा वठारे मॅडम,नेवासा गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम,* यांनी आपल्या कार्याचा आलेख सांगितलं तसेच पंढरपूर मधील दत्तक शाळा उपक्रम फारच सकारात्मक वाटला
तसेच नेवासा तालुका राजकीय व शिक्षक संघटनात्मक संवेदनशील असूनही एक महिला अधिकारी म्हणून करत असलेल्या कामाची पद्धत सर्वाना एक नवी उमेद देत होती
वाबळेवाडी व पावरवाडी या शाळेनी आपल्या शाळेचे सादरीकरण केले
दुसऱ्या दिवशी केंद्र स्तरावरील सादरीकरण झाले
पूर्णा तालुक्याचे *गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे साहेब* यांनी त्यांच्या खड्या आवाजातील मार्गदर्शनात काम कसे करावे व काम कश्यासाठी करायचे हे समजावून सांगितलं
शेवटी साहेबानी वामनदादा कर्डक यांची कविता गायन करून सभागृहामध्ये नवचैतन्य निर्माण केले
बऱ्याच दिवसाची साहेबांनी गायलेली कविता ऐकायची इच्छा पूर्ण झाली
त्याच बरोबर गेवराईचे विस्तार अधिकारी प्रेरणादायी व्यक्तिमत्व *काळम पाटील साहेब* यांनी त्यांनी लोकसहभाग कसा जमवला हे सांगून व काम कसे केले याविषयी मार्गदर्शन केले
अचानक सभागृहात प्रवेश झाला तो स्फूर्तीचा अखंड झरा असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील आधुनिक सावित्रीचा म्हणजेच..
*लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे* यांचा
तृप्ती ताईंनी अगदी मोजक्या शब्दात आपल्या कार्याची माहिती देऊन सभागृहातील सर्वाना काम करत रहा हे सांगितले
दुपारी एक वाजता आदरणीय
*शिक्षण संचालक नांदेडे साहेब व शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* आले
या मान्यवरांच्या समोर मला सादरीकरण करण्याची संधी मिळाली हे मी माझे
भाग्य समजतो
आदरणीय नांदेडे साहेब यांनी अगदी प्रेरणादायी शब्दात सम्पूर्ण सभागृहाला काम करण्याची प्रेरणा दिली,प्रत्येकाच्या मनामध्ये एक ऊर्जित अवस्था निर्माण केली
आभाळा एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व पण कसलाही मी पणा नाही कि पदाचा गर्व नाही
साहेबांकडून खूप काही शिकता आले,साहेबानी मूल शिकलं पाहिजे याचे आवाहन केले
*शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* यांनी त्यांच्या शैलीमध्ये उपस्थित सभागृहाला विविध उदाहरणाचा दाखल देत मार्गदर्शन केले यातील साहेबांचे रेल्वे ने प्रवास करणाऱ्या मुलगा वडील आणि गाडीतील सहप्रवाश्याचे उदाहरण देऊन लोकांच्या मनामध्ये नवचैत्यन निर्माण केले
*तसेच प्रगत मधील प्र म्हणजे*
*प्रेरणा ,प्रयत्न व प्रगती या* शब्दात वर्णन केले
या परिषदेसाठी आंग्लभाषा औरंगाबाद चे कांबळे साहेब ही दोन दिवस उपस्थित होते
या परिषदेच्या नियोजनासाठी ज्यांनी मेहनत घेतली अश्या हवेलीच्या *गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार मॅडम* यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन
प्रत्येक परिसंवाद सादरीकरणाचे नियोजन अगदी सुंदर असे केले
त्याच बरोबर *संगीता शिंदे मॅडम* यांनी त्यांना छान अशी साथ दिली
तसेच पुण्याचे *उपशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे साहेब* व इंदापुरचे गटशिक्षणाधिकारी गुरव साहेब यांनी
आपल्या अनुभवाच्या आधारे अतिशय कार्यकुशलतेने परिषदेचे आयोजन केले आणि नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी केली. आज पुन्हा त्याच्यातील कुशलनेतृत्व दिसले.
एकंदरीतच ही दोन दिवशीय शिक्षण परिषद फारच सकारात्मक झाली.या दोन दिवसात खूप काही शिकता आले
*ही परिषद माझ्यासाठी खुप प्रेरणादायी ठरली कारण आपण करत असल्या कामाची पावती आज मिळाली*
यापेक्षा वेगळा काय आनंद असू शकतो
🙏🙏🙏🙏🙏
*विक्रम अडसूळ*
*कर्जत अहमदनगर*
*मोबा.9923715464*